Mumbai: मुंबईतील जम्बो कोविड सेंटर टप्याटप्याने बंद होणार; रुग्णसंख्या घटल्याने पालिकेचा निर्णय

Jumbo Covid Centre In Mumbai: रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे १० जम्बो कोविड केंद्रांपैकी १ ते २ केंद्रे सुरू ठेऊन, हळूहळू हे दोन्ही केंद्रही बंद करण्याचा निर्णय पालिका घेणार आहे.
Jumbo covid centers closed soon in Mumbai
Jumbo covid centers closed soon in MumbaiSaam Tv
Published On

मुंबई: देशात आणि राज्यात कोरोनाची (Corona) तिसरी लाट ओसरली असून मुंबईतही (Mumbai) कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे मुंबईतील जम्बो कोविड सेंटर्स हे टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने (BMC) घेतला आहे. जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने सर्व जम्बो कोविड केंद्र (Jumbo Covid Centers) पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा पालिकेने निर्णय घेतला होता. पण सध्या रुग्णसंख्येत (Covid Patients) घट होत असल्यामुळे १० जम्बो कोविड केंद्रांपैकी १ ते २ केंद्रे सुरू ठेऊन, हळूहळू हे दोन्ही केंद्रही बंद (Closed) करण्याचा निर्णय पालिका घेणार आहे. (The Jumbo Covid Center in Mumbai will be phased out; Decision of the bmc due to decrease in the number of covid patients)

हे देखील पहा -

Jumbo covid centers closed soon in Mumbai
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय अनधिकृत, पालिकेने ते तोडावे - भीम आर्मी

रुग्णसंख्या आणखी कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही केंद्रे बंद करण्यात येतील. त्यामुळे पालिकेचा मनुष्यबळावर होणारा खर्च वाचणार आहे. या जम्बो कोविड केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या ३० हजार रुग्णशय्यांपैकी (बेड्स - Beds) ९०% रुग्णशय्या रिक्त (रिकाम्या) आहेत. सध्या मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ४०९६ आहे, त्यापैकी केवळ ३४७ रुग्णांमध्ये लक्षणे असून इतर ३४९२ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये २५७ रुग्ण अत्यवस्थ आहेत. सध्या मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८% आहे, तर रुग्ण वाढीचं प्रमाण ०.०८% आहे आणि रुग्ण दुप्पटीचा कालावधी ९४० दिवस आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत होणारी घट पाहता पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com