Aai Ekvira: ‘एक वीर’ मोहिमेने घडवला बदल; आई एकवीरा गडावरील सुविधांसाठी मिळाला अडीच लाखांचा निधी

Aai Ekvira Gad: पुण्यातील कार्ले डोंगरावर वसलेली आई एकवीरा पाऊण महाराष्ट्राची कुलदेवी मानली जाते. महाराष्ट्रातील आगरी, कोळी,कुणबी,सीकेपी अन इतर समाजातील मोठा वर्ग आई एकवीरेचा भक्त आहेत. पंरतु गेले अनेक वर्ष श्रीक्षेत्र एकवीरा आई गडावरील असुविधांमुळे भक्तांना मोठ्या अडचणी सहन कराव्या लागत आहेत.
Aai Ekvira Gad
Aai Ekvira GadSaam Tv
Published On

(रिद्धेश तरे,मुंबई)

Aai Ekvira Gad Facilities Ek veer Campaign :

कार्ला येथील आई एकवीरा गडाच्या संवर्धनासाठी राबवण्यात आलेल्या ‘एक वीर’मोहिमेचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. एक वीर मोहिमेने गडावरील सुविधांची स्थिती सोशल मीडियावर दाखवल्यानंतर अनेक समाजकार्य करणाऱ्या संस्था गड संवर्धनासाठी सरसावल्या आहेत. जिजाऊ शैक्षणिक अन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पंचमहाभूत यांच्या ‘एक वीर’मोहिमेला समर्थन देत एकवीरा गडावरील स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीसाठी ‘अडीच लाखांचा निधी’ देखील घोषित केला आहे. (Latest News)

पुण्यातील कार्ले डोंगरावर वसलेली आई एकवीरा पाऊण महाराष्ट्राची कुलदेवी मानली जाते. महाराष्ट्रातील आगरी, कोळी, कुणबी,सीकेपी अन इतर समाजातील मोठा वर्ग आई एकवीरेचा भक्त आहे. पंरतु गेले अनेक वर्ष श्रीक्षेत्र एकवीरा आई गडाच्या पायऱ्यांची दुर्दशा त्यामुळे चढता-उतरताना वयस्कर, महिलांची होणारा त्रास,हानी, स्वच्छतागृहाची गैरसोय त्यामुळे अनेक भाविकांना मनस्ताप सहन करायला लागतोय. मागील सरकारने आता सत्तेत असलेल्या सरकारनेही या गडाच्या विकासासाठी घोषणा जाहीर केल्या, परंतु त्याची अंमलबाजवणी झालेली नाहीये.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या पार्श्वभुमीवर पंचमहाभूत संघटेचे गणेश बाळकृष्ण पाटील,सुशांत पाटील, ॲड.सुशांत पाटील, युवा साहित्यिक सर्वेश तरे,रुपेश धुमाळ आणि वैभव नाईक यांनी एकवीरा आईच्या गडाच्या संवर्धनार्थ ‘एक वीर’मोहीम राबवली. त्याच्या पहिला टप्पा म्हणून एकवीरा गडाचा पहाणी दौरा करुन पायऱ्यांची दुरावस्था, तुंबलेल्या स्वच्छतागृहाची अवस्था आणि इतर समस्यांची डॉक्यूमेंटरी रिपोर्ट सोशल मीडियावर प्रसिध्द केली. यामुळे अनेक एकवीरा भक्तांनी सामाजिक संस्था तसेच अनेक एकवीरा पालखी मंडळांनी ( नेरळ मानाची पालखी,श्री.जरी मित्र मंडळ तिसगाव पालखी,नवी मुंबई मानाची पालखी) नी या मोहिमेत सहभाग दर्शवला.

पंचमहाभूत संघटनेच्या या संकल्पनेतून प्रेरणा घेत फेब्रुवारी ‘महादुर्ग एडवेंचर्स’या दुर्गसंवर्धन संस्थेने ‘एक वीर’ मोहीमेत सहभाग होऊन एकवीरा गडावर स्वच्छता मोहीम राबवली. सर्वांनी एकवीरा गडाच्या संवर्धनार्थ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन महादुर्ग संस्थेच्या .ऋतिका नितेश पाटील यांनी केले. ‘एक वीर’ मोहीमेचा पुढचा टप्पा हा ‘ठाणे, भिवंडी,कल्याण-डोंबिवली,नवी मुंबई,पनवेल,मुंबई,वसई-पालघर येथे लवकरच मोहीमेची जाहीर सभा होणार असून थेट एकवीरा गडावर जनआंदोलनाचा इशारा पंचमहाभूत संघनेने दिलाय.

Aai Ekvira Gad
Dev Uthani Ekadashi 2022 : आज कार्तिकी एकादशी; जाणून घ्या, शुभ मुहूर्त व महत्त्व

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com