मुंबई : काल जाहीर झालेल्या निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपला मिळालेलं घवघवीत यश आणि काँग्रेसची (Cngress) झालेला पराभव यावरती प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला टोला लगावला आहे.
ते म्हणाले, ही लोकशाही आहे इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी (Indira Gandhi, Atal Bihari Vajpayee) निवडणूक हरले आहेत. 2024 मध्ये 2 खासदारांची पार्टी पुन्हा होण्यास भाजप ला वेळ लागणार नाही. जल्लोषाचे मला शब्द वापरता येत नाहीत. भाजपमध्येही भ्रष्टाचारी माणसे आहेत त्याच्यावर मोदी का बोलत नाहीत, नारायण राणे यांच्या भ्रष्टाचारावर फडणवीस बोलले होते आता ते का बोलत नाहीत असा सवाल करत या प्रकरणांमुळे भाजपची (BJP) दोगली भूमिका पाहायला मिळते असंही म्हणाले.
केंद्र सरकारच्या (Central Government) महागाईमुळे जनता होरपळली आहे. राज्यसरकारने महागाई, शेतकरी, कामगारांना न्याय देण्यासाठी वेळ पडली तर कर्ज घेऊन मदत करावी अशी आमची भूमिका आहे. राष्ट्रपती राजवट (Presidential Reign) लावायची भूमिका भाजप आधीपासूनच मांडत आहे. मात्र महाराष्ट्र सरकारला धोका नाही 5 वर्ष सरकार चालेल. भ्रष्टाचाराचा एक पॅरॅमिटर ठरला पाहिजे. भाजप मध्ये ही भ्रष्टाचार आहेत असही ते यावेळी म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.