फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला जबाब नोंदवण्यासाठी मुंबईत दाखल

रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना फोन टॅपिंग केले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Rashmi Shukla News | Phone Tapping Case
Rashmi Shukla News | Phone Tapping CaseSaam Tv
Published On

मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणी अखेर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ((Rashmi Shukla) जबाब नोंदवण्यासाठी कुलाबा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या डॉ. रश्मी शुक्ला या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस (Police) दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. शुक्ला यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना फोन टॅपिंग केले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay raut), राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांच्या फिर्यादीवरून कुलाबा पोलिसांनी (Police) भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्ला यांना अटकेपासून संरक्षण देत 16 आणि 23 मार्च रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदविण्याच्या सूचना केल्या होत्या.

Rashmi Shukla News | Phone Tapping Case
Video : IPS अधिकारी रश्मी शुक्लांची फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी

फोन टॅप प्रकरण काय आहे?

डॉ. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्य शासनाला अहवाल दिला होता. यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅप केल्याचा आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता.

Edited By - Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com