'महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे मनसुबे पुन्हा उधळले'

'एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करा.'
Sameer Wankhede
Sameer WankhedeSaam TV

मुंबई : कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग पार्टीसंदर्भात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला केलेली अटक हा एक पूर्वनियोजित कट होता, हे एनसीबीने आर्यनला दिलेल्या क्लिन चीटने स्पष्ट झाले आहे. NCB च्या माध्यमातून महाराष्ट्र म्हणजे ड्रग्जचे राज्य असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.

या सर्व प्रकरणात महाराष्ट्राची देशात प्रचंड बदनामी झाली आहे. कॉर्डिलियासह समीर वानखेडेंनी (sameer wankhede) केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे.

हे देखील पाहा -

आर्यन खान केसबाबत बोलताना लोंढे म्हणाले की, या ड्रग्ज पार्टी प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे. हे सुरुवातीपासूनच दिसून येत होते. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्र अस्थिर करण्याच्या षडयंत्राचाच हा एक भाग होता. कॉर्डिलिया (Cordelia Cruise) छापेमारीमध्ये भाजपाशी संबंधित लोकांचा थेट एनसीबी कार्यालयात उघड वावर होता. ही कारवाई करण्यासाठी गुजरातपासून कसा सापळा रचला होता याचा मंत्री नबाव मलिक यांनी पर्दाफाश केला. नवाब मलिक यांचे आरोप हे खरे होते, हे आज स्पष्ट झाले आहे.

आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नसतानाही त्याला कोठडीत डांबून ठेवले होते. आता एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानचे नावही नाही. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी बॉलिवूडसह मुंबई व महाराष्ट्राचे नाव बदनाम करण्याचे काम केले आहे.

Sameer Wankhede
आर्यन खानला क्लीन चिट मिळताच नवाब मलिकांचं ट्विट, म्हणाले...

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पक्ष काम करत आहे. ED इन्कम टॅक्स, सीबीआय, एनआयए, NCB या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून बनावट कारवाया करण्यात आल्या तसंच मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा अशा षडयंत्राचेच बळी ठरले आहेत. अभिनेता सुशांतसिंह, प्रकरणातही राज्य सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले गेले पण सत्य अखेर सत्य असते ते लपत नसते हे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने मात्र महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या या महाराष्ट्रद्रोहींची चौकशी करून त्यांना जेलची हवा दाखवावी, असेही लोंढे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com