Kamya Kartikeyan: मुंबईची १६ वर्षीय काम्या कार्तिकेयन ठरली माउंट एव्हरेस्ट सर करणारी देशातील सर्वात तरुण गिर्यारोहक

Kamya Kartikeyan News: माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणे ही खूप अवघड गोष्ट आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करताना इच्छाशक्ती, ताकद याचा पुरेपूर वापर करावा लागतो. अशीच इच्छाशक्ती मनात ठेवून मुंबईत शिकणाऱ्या काम्या कार्तिकेयनने वयाच्या १६ व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करुन विक्रम केला आहे.
Kamya Kartikeyan
Kamya KartikeyanSaam Tv

माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणे ही खूप अवघड गोष्ट आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करताना इच्छाशक्ती, ताकद याचा पुरेपूर वापर करावा लागतो. अशीच इच्छाशक्ती मनात ठेवून मुंबईत शिकणाऱ्या काम्या कार्तिकेयनने वयाच्या १६ व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करुन विक्रम केला आहे.

काम्या कार्तिकेयनने नेपाळच्या बाजूने माउंट एव्हरेस्ट सर केला आहे. हे शिखर सर करणारी काम्या देशातील सर्वात तरुण मुलगी आहे. तिच्या या विक्रमाची नोंद अनेकांनी घेतली आहे. काम्याने याआधीही अनेक विक्रम केले आहेत.

काम्या ही कुलाब्यातील नौदल शाळेत शिकते. तिने वयातच्या सातव्या वर्षापासूनच गिर्यारोहणाला सुरुवात केली. तिने आतापर्यंत जगातील अनेक उंच शिखरे सर केली आहेत. दक्षिण अमेरिकेतील माउंट अकॉनगुआ हे शिखर सर करणारी सर्वात तरुण गिर्यारोहक म्हणून काम्याने आपले नाव कोरले आहे. तर टांझानियातील माउंट किलीमांजारे सर करणारी आशियातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे.

Kamya Kartikeyan
Dombivali MIDC Blast : MIDC स्फोटातील मृतांचा आकडा 8 वर, 64 जण जखमी

काम्या खूप दिवसांपासून माउंट एव्हरेस्ट सर करण्याची तयारी करत होती. या सगळ्यात तिला तिचे वडिल कमांडर एस कार्तिकेयन यांनी खूप साथ दिली. काम्याचे वडिल हे नौदलात कमांडर ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. तर आई लावण्या या नौदल शाळेच्या प्रमुख आहेत.

Kamya Kartikeyan
Vegetable Price Increases: सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! लसणाची फोडणी महागली, पालेभाज्यांचे दरही गगनाला भिडले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com