Indian Railways: रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! होळीसाठी विशेष ट्रेन धावणार, पाहा यादी

मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून विशेष होळी सुपरफास्ट ट्रेन चालविण्याचा निर्णय रेल्वेने प्रशासनाने हाती घेतला
Indian Railways News
Indian Railways NewsSaam Tv
Published On

मुंबई: भारतीय रेल्वेने (IRCTC) प्रवाशांना दिलासा दिला आहे. मुंबई सेंट्रल (Mumbai Central) आणि वांद्रे टर्मिनस (Bandra Terminus) येथून विशेष होळी सुपरफास्ट ट्रेन चालविण्याचा निर्णय रेल्वेने प्रशासनाने हाती घेतला आहे. या विशेष गाड्यांचे बुकिंग आज २ मार्च २०२२ पासून PRS काऊंटर आणि IRCTC वेबसाईट irctc.co.in वर सुरू करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने (Western Railway) ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार की, होळीच्या सणादरम्यान प्रवासाची मागणी पूर्ण करण्याकरिता मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून विशेष होळी स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रेन क्रमांक ०९०३९, ०९०३५, ०९००५ आणि ०९००६ करिता बुकिंग २ मार्च २०२२ पासून PRS वर सुरू करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

होळीसाठी सुपरफास्ट गाड्यांचे तपशील

- ट्रेन क्रमांक ०९०३९ ही २ मार्च रोजी रात्री ११.५५ वाजता जयपूरसाठी मुंबई सेंट्रलहून निघणार आहे, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.२५ वाजता आपल्या गंतव्यस्थानी पोहोचणार आहे.

- ट्रेन क्रमांक ०९०४० जयपूर ते बोरिवली १७ मार्च दिवशी रात्री ९.१५ वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.१० वाजता आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचणार आहे.

- ट्रेन क्रमांक ०९०३५ ही १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे टर्मिनसवरून की कोठीकरिता निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता गंतव्यस्थानावर पोहोचणार आहे.

- ट्रेन क्रमांक ०९०३६ ही १७ मार्च रोजी सकाळी ११.४० वाजता वांद्रे टर्मिनस येथून भगत की कोठी सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१५ वाजता गंतव्यस्थानावर पोहोचणार आहे.

- ट्रेन क्रमांक ०९००५ ही १४ मार्च रोजी वांद्रे टर्मिनस ते भावनगर टर्मिनसला रात्री ९.४५ वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता गंतव्यस्थानी पोहोचणार आहे.

-गाडी क्रमांक ०९००६ ही १६ मार्च रोजी सकाळी १०.१० वाजता भावनगर टर्मिनस ते वांद्रे टर्मिनसकरिता सुटणार आहे. त्या दिवशी ११.२५ वाजता ते गंतव्यस्थानी पोहोचणार आहे.

Indian Railways News
महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करू नका

परंतु, जनरल तिकीट काढून प्रवास करता येणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने आपल्या आदेशामध्ये सांगितले आहे की, सर्व गाड्या अगोदरप्रमाणे पूर्ववत करण्यात आले आहेत. जनरल डब्यांची जुनी व्यवस्था पूर्ववत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रवाशांना आता अगोदर प्रमाणेच ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. यामुळे आता प्रवाशांना जनरल तिकिटावर प्रवास करता येणार असल्याचे रेल्वेने माहिती दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com