India Alliance News
India Alliance NewsSaam Tv

India Alliance News: मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्या INDIA ची सभा, कल्याणमधील राजकीय गणित बदलणार?

Kalyan News: मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्या INDIA ची सभा, कल्याणमधील राजकीय गणित बदलणार?
Published on

>> अभिजित देशमुख

India Alliance News:

कल्याणमध्ये उद्या इंडिया आघाडीची जाहीर सभा व कार्यकर्ता मेळावा होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड या सभेत संबोधित करणार असून या सभेसाठी व कार्यकर्ता मेळाव्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी देखील उपस्थित राहणार असल्याचे माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिलीय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

India Alliance News
Dombivli Crime News: डोंबिवली हादरली! मित्राला दारू आणायला पाठवून तरुणीवर केला सामूहिक अत्याचार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याणमध्ये INDIA ची सभा व कार्यकर्ता मेळावा होणार आहे. यासाठी उद्या आमदार रोहित पवार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.  (Latest Marathi News)

आम आदमी पार्टीचे पदाधिकारी देखील या जाहीर सभा व कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी होणार आहेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ता महेश तपासे यांनी सांगितले की, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या संदर्भात झालेला अन्याय, शिवसेनेमध्ये झालेला बंड, राष्ट्रवादीमधील जे काही लोक सरकारमध्ये गेले, त्या संदर्भात तसेच राज्यभर देशभरात निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत या सभेत रोहित पवार आपलं मत व्यक्त करणार असल्याचे सांगितले.

India Alliance News
LIC Schemes: LIC च्या 'या' योजनेत फक्त एकदाच जमा करावे लागतील पैसे, आयुष्यभर मिळेल 50,000 रुपये पेन्शन

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीमध्ये येतायत. कल्याण डोंबिवली हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या समर्थकांसह सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर कल्याण डोंबिवलीमधील राष्ट्रवादीचे बहुतेक पदाधिकार्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे येत्या लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार काय बोलतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com