Rajya Sabha Election: 'अपक्ष आमदार शरीराने मुख्यमंत्र्यांकडे, मनाने भाजपसोबत'

'ज्या अपक्ष आमदारांना मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावलं होतं, ते आमदार शरीराने मुख्यमंत्र्यांसोबत असले तरी, मनाने आणि तनाने ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत.
RajyaSabha Election
RajyaSabha ElectionSaam TV
Published On

रश्मी पुरणिक -

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाला आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मतांची जुळवा जुळव करण्याच्या मागे लागले आहेत.

या निवडणुकांमध्ये पक्षातील आमदारांएवढं कदाचित त्यापेक्षा जास्त महत्व हे अपक्ष आमदारांना असतं त्यामुळे अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. अशातच आता मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेशी वैर पत्करलेले अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा (BJP) उमेदवारच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.

हे देखील पाहा -

रवी राणा (Ravi Rana) म्हणाले, 'राज्यसभा निवडणूकीत भाजपचाच उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येईल, ज्या अपक्ष आमदारांना मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावलं होतं ते आमदार शरीराने मुख्यमंत्र्यांसोबत असले तरी, मनाने आणि तनाने ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येईल यामध्ये शंका नाही. कितीही घोडेबाजार झाला तरीही या आमदारांची मते भाजपलाच मिळतील.' असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन सुरु झालेल्या चर्चा अजून कमी झालेल्या नाहीत. एकीकडे प्रत्येत पक्षातील आमदारांच्या संख्येवरुन राज्यसभेसाठी ५ जागांवरती उमेदवारी देऊन ती बिनविरोध होणार असं वाटत असतानाच, भाजपने धनंजय महाडिक यांचा सहावा अर्ज भरल्याने पुन्हा या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी अटीतटीची लढाई होणार यामध्ये शंका घेण्याचा प्रश्नच नाही.

अशातच आता भाजपने आपण विधान परिषदेची देखील पाचवी जागा लढवार असल्याचा दावा केला आहे. तसंच जर महाविकास आघाडीने राज्यसभेचा एक उमेदवार मागे घेतला तर, आपण विधान परिषदेचा पाचवा उमेदवार देणार नसल्याचा दावा भाजपने केल्याची माहिती समोर येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com