अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांच्या मंजुरीसाठी शिक्षकांचे बेमुदत उपोषण

पुढील आठ दिवसात प्रश्न मार्गी लागला नाहीतर मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा शिक्षक आमदारांनी सरकारला दिला आहे.
अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांच्या मंजुरीसाठी शिक्षकांचे बेमुदत उपोषण
अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांच्या मंजुरीसाठी शिक्षकांचे बेमुदत उपोषणसागर आव्हाड
Published On

पुणे: राज्यातील अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदावरील शिक्षक 2 सप्टेंबरपासून आपल्या मागण्यांसाठी शिक्षण आयुक्तालय पुणे येथे कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. 2 सप्टेंबर पासून वाढीव पदांच्या मंजुरीसाठी शिक्षण आयुक्तालय, पुणे या ठिकाणी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. (Indefinite fast of teachers for sanction of incremental posts in subsidized junior colleges)

हे देखील पहा -

या आंदोलनाची दखल घेऊन शिक्षक व पदवीधर आमदार बाळाराम पाटील, सुधीर तांबे, श्रीकांत देशपांडे, किशोर दराडे, आमदार विक्रम काळे, जयंत आसगावकर,आमदार अभिजित वंजारी,आमदार किरण सरनाईक, मा. आ. दत्तात्रय सावंत या सर्वांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि आंदोलनत सहभागी झाले. वाढीव पदावरील हे शिक्षक गेली 17 ते 18 वर्ष अनुदानित महाविद्यालयात पूर्णवेळ व अर्धवेळ विनावेतन काम करत आहेत. शासन वाढीव पदावरील शिक्षकांची माहिती वारंवार मागवून वेळकाढूपणा करीत असल्याने या शिक्षकांची सहनशीलता संपली आहे. या शिक्षकांची परिपूर्ण माहिती शिक्षण आयुक्तांनी त्वरीत मुंबईला पाठवावी व नियुक्ती दिनांकापासून आर्थिक तरतूदींसह मान्यता मिळावी या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांच्या मंजुरीसाठी शिक्षकांचे बेमुदत उपोषण
''ओवैसींचा अजेंडा धार्मिक, त्यांना दुसरे जिन्ना व्हायचयं आणि...'' - भाजप आमदाराचा दावा

या मागण्या जर मंजूर झाल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शिक्षक आमदार अभिजित वंजारी जयंत आजगावकर आणि बाळाराम पाटील यांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com