परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; राज्य CID करणार प्रकरणाची चौकशी

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली होती.
परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; राज्य CID करणार प्रकरणाची चौकशी
परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; राज्य CID करणार प्रकरणाची चौकशीSaam Tv

मुंबई: राज्य सीआयडी (State CID) आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात नोंदवलेल्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. श्याम सुंदर अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी परमबीर सिंह आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, यापुर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जालान (international cricket bookie sonu jalan) आणि केतन तन्ना यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात (thane nagar police station) परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. बुकी प्रकारणात खोट्या गुन्ह्यात अडकवून वरून करोडो रुपय वसूल केल्याचा आरोप जालान यांनी केला होता.

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; राज्य CID करणार प्रकरणाची चौकशी
भाजप-राष्ट्रवादीची पुण्यात रंगलिये पोलखोल स्पर्धा!

परमबीर सिंग यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त पदावर असताना राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल (anil deshmikh) देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुल करून देण्याचा दबाव टाकल्याचा आरोप केला होता ज्यामुळे अनिल देशमुख यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्या प्रकरणानंतर परमबीर सिंग यांच्या नशिबाचे फासेच उलटे पडले असून या आधी ठाण्यातील कोपरी पोलिस स्थानकात (kopari police station) देखील काही दिवसांपूर्वी व्यावसायिक शरद अग्रवाल यांच्याकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि जमिनी बळजबरीने नावावर करण्यात असल्याच्या आरोपावरुन परमबीर सिंग यांच्यावर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत अजून वाढ होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com