Mumbai: पशुजन्य खाद्यपदार्थ सेंटरचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या समर्थ नेतृत्वामुळे विभागाने २०२० पर्यंत सामुहिक स्वास्थ आणि पशुजन्य खाद्यपदार्थ संशोधनामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarरामनाथ दवणे
Published On

मुंबई - मुंबई पशु वैद्यकीय महाविद्यालयच्या सामुहिक स्वास्थ आणि पशुजन्य खाद्यपदार्थ सेंटरचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. यावेळी पशु वैद्यकीय मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) ,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित आहेत. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (Nagpur) यांच्या समर्थ नेतृत्वामुळे विभागाने २०२० पर्यंत सामुहिक स्वास्थ आणि पशुजन्य खाद्यपदार्थ संशोधनामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. अन्न स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य विभागात अग्रगण्य संशोधन कार्याचा पाया घातला गेला ज्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. (Inauguration of Animal Feed Center by Deputy Chief Minister)

हे देखील पहा -

त्यामुळे सन २०२० मध्ये जागतिक बँक पुरस्कृत आयसीएआर नाहेप-कास्ट या प्रकल्पांतर्गत "प्राणीजन्य अन्नसुरक्षेविषयी उत्कृष्ट प्रगत संशोधन केंद्र" हि योजना सुरू झाली असून या योजनेअंतर्गत विभागात सर्व सुविधा युक्त अद्ययावत प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे. सदर प्रयोगशाळेत अद्ययावत उपकरणे असून या उपकरणांचा उपयोग प्राणीजन्य अन्नपदार्थाचे जसे की, मास, अंडी, दूध, मासे आणि त्यांच्यापासून बनविलेल्या पदार्थाच्या भौतिक, रासायनिक आणि सुक्ष्मजैविक चाचण्या करून त्यांच्या गुणवत्तेचे परिक्षण करण्यात येईल. मुंबई आणि राज्यातील इतर ठिकाणी कार्यरत असणाऱ्या विविध मांस, दुध, अंडी, मासे आणि त्यांच्या उपपदार्थांचे उत्पादन करणाऱ्या उद्योजकांना तसेच शेतकरी बांधवाना या प्रयोगशाळेचा उपयोग होईल.

Ajit Pawar
चुकीचे रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदारांना महावितरणचा दणका; ६ वीजमीटर रीडिंग एजन्सी बडतर्फ

तसेच आपल्या देशात निर्माण होणारे उपरोक्त पशुजन्य उपपदार्थांची निर्यात करण्याकरीता आवश्यक असणाऱ्या विविध चाचण्या या प्रयोगशाळेत करण्यात येणार आहेत.सदर प्रयोगशाळेत विद्यार्थी, प्राध्यापक, शेतकरी, उद्योजक यांच्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील. विभागामध्ये विविध प्रकल्पांतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत असून त्याची दखल भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी घेतली आहे.

सद्यपरिस्थितीत ग्राहकांची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्यामुळे बाजारपेठांमध्ये मांस आणि मांसजन्य पदार्थाची मागणी वाढली आहे तसेच ग्राहकांमध्ये हि अन्नसुरक्षेविषयी जागरूकता निर्माण झाल्यामुळे ते ही चांगल्या मांस आणि मांसजन्य पदार्थांची मागणी करत आहेत. देशामध्ये आणि राज्यामध्ये पशुजन्य अन्नपदार्थांची निर्मिती करणा-या उत्पादकांना पशुखाद्याच्या गुणवत्तेची चावणी व परिक्षण करण्यास प्रयोगशाळेची मदत होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com