सुरज सावंत
मुंबई: महाराष्ट्रातील फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची अनेकदा चौकशी केली आहे. याच प्रकरणात मंत्री एकनाथ खडसे यांचा देखील फोन टॅप झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे पीडित म्हणून काल एकनाथ खडसे यांना समन्स बजावण्यात आले होते. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आज चौकशीसाठी बोलावले होते. खडसे चौकशीसाठी आज उपस्थित झाले असता, तब्बल २ तास एकनाथ खडसे यांनी आपला जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. त्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर झाला आहे. खडसे यांच्याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोनही टॅप करण्यात आला होता. त्यामुळे हा संपूर्ण तपास सुरू आहे. हे फोन टॅपिंग महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी घडले होते. दोन्ही नेत्यांचे फोन दोनदा टॅप झाल्याचा आरोप आहे. तेव्हा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) या एसआयडीच्या प्रमुख होत्या.
याप्रकरणी रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्यात आल्याने या फोन टॅपिंग प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते. MVA सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता.
मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणाबाबत रश्मी शुक्ला यांची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. मात्र रश्मी शुक्ला चौकशीदरम्यान प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्ला त्यांच्या उत्तरात कोणतेही स्पष्ट उत्तर देत नव्हत्या. रश्मी शुक्ला त्यांच्या उत्तरात वारंवार हेच सांगत होत्या की, त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही.
हे देखील पहा-
आयपीएस अधिकारी शुक्ला तपासात पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे आता हायकोर्टात पुढील सुनावणीदरम्यान पोलिस त्यांच्या जामीन अर्जाला विरोध करणार आहेत. तर, रश्मी शुक्ला यांना अटकेपासून न्यायालयाकडून संरक्षण मिळाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.