मुख्यमंत्र्यांविरुद्ध प्रक्षोभक बोलणं ठाकरे गटाच्या अंगलट; सुषमा अंधारे, भास्कर जाधवांसह ७ जणांवर गुन्हा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल.
Eknath Shinde Vs Sushma Andhare, Bhaskar Jadhav
Eknath Shinde Vs Sushma Andhare, Bhaskar JadhavSaam TV
Published On

ठाणे: ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे 9 ऑक्टोंबरला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाप्रबोधन यात्रा जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या दरम्यान उपस्थित ठाकरे गटाचे वक्ते आणि आयोजकांवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आलं आहे.

गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये खासदार विनायक राऊत, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare,), भास्कर जाधव, राजन विचारे, सचिन चव्हाण अणि अनिता बिरजे आयोजक मधुकर देशमुख यांचा समावेश आहे.

पाहा व्हिडीओ -

वरील ठाकरे गटातील नेत्यांवरती गुन्हा दाखल केल्यामुळे आता ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे. सध्या राज्याच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे (Uddhav Thackeray) गटात विविध कारणांवरून वाद सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मग तो चिन्हाचा वाद असो, शिवसेना नावाचा वाद असो, किंवा शिवसेना शाखेचा वाद असो.

ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात गरळ ओकली जात आहे. दसरा मेळावा दरम्यान देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या विरोधात सडकून टीका केली.

या दसरा मेळाव्यानंतर ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मोठ्या थाटामाटात ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रा या जाहीर मेळाव्याचे आयोजन केलं होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार विनायक राऊत, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, राजन विचारे, सचिन चव्हाण अणि अनिता बिरजे आयोजक मधुकर देशमुख या सर्वांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे हा वाद ठाण्यात पुन्हा होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com