मुंबई: राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron Variant) शिरकाव झाला आहे. त्यानंतर मुंबई महानगरपालिका BMC कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसून तयार झाली आहे. यापूर्वी कोरोनाच्या दोन्ही लाट या आल्या होत्या. त्यावेळेस मुंबई (Mumbai) हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. त्यामुळे पालिकेने ओमिक्रॉनला रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर तयारी सुरु केली आहे. पालिकेकडून सध्या पालिकेकडून कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर दिला जात आहे.
हे देखील पहा-
पालिकेकडून तब्बल २० लाख अँटिजेन टेस्ट (Antigen Test) किटची खरेदी केली जाणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत तर त्यासाठी अनेक कंत्राटदारांनी त्यासाठी उत्सुकता देखील दर्शविली आहे. त्यामुळे, कंत्राटदारांमधील या स्पर्धेमुळे पालिकेला अँटिजेन टेस्ट किट अवघ्या नऊ रुपयांमध्ये मिळू शकते. तसेच टेस्टनंतर फक्त अर्ध्या तासात अहवाल देता येईल अशी योजनाही पालिकेने आखली गेली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांना त्वरित ओळखून त्यांना इतरांपासून तातडीने विलग (Quarantine) करणे शक्य होईल.
पाच लाख किट सुरुवातीच्या टप्प्यात खरेदी केली जातील. तर, अँटीजेन किट खरेदी केल्यानंतर पालिकेकडून रेल्वे स्टेशन, मॉल, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, बस स्थानके अशा ठिकाणी चाचण्या केल्या जातील. विशेष म्हणजे पालिकेच्या चाचणी केंद्रात अँटीजन चाचणी विनामूल्य केली जाईल.
दक्षिण आफ्रिका, युरोपमध्ये ओमिक्रॉनने थैमान घातले आहे. ओमिक्रॉनचे आतापर्यंत केवळ दोन बाधित रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. राज्यात आतापर्यंत एकूण 10 ओमीक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळलेले आहेत. मात्र ता. 8 आणि 9 हे दोन दिवस राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नाही त्यामुळे मोठा राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.