खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा; नवी मुंबईत 4 दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोना

राज्यात रोजची रुग्णसंख्या परत एकदा ४० हजारांच्या पुढे जात आहे.
खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा; नवी मुंबईत 4 दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोना
खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा; नवी मुंबईत 4 दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोनाSaam Tv
Published On

मुंबई: राज्यामध्ये सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात कहर सुरू आहे. राज्यात रोजची रुग्णसंख्या (patients) परत एकदा ४० हजारांच्या पुढे गेली आहे. लोकांच्या सुरक्षेकरिता रात्र- दिवस तैनात असणाऱ्या आणि कोरोना (Corona) काळात तुमच्या आमच्या सुरक्षेची काळजी घेण्याकरिता रस्त्यावर उतरणाऱ्या खाकी वर्दीला देखील कोरोनाचा विळखा वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नवी मुंबईतील (Navi Mumbai) वरिष्ठ पोलीस (Police) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे.

हे देखील पहा-

गेल्या ४ दिवसात १८ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १२१० पोलीस कर्मचाऱ्यांना (employees) कोरोनाची लागण झाली आहे. एकूण १३९० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये ३० जणांवर विविध हॉस्पिटलमध्ये (hospital) उपचार करण्यात येत आहेत. मुंबई मधील २ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु देखील झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी १५ अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर १८६ अधिकारी आणि १२४३ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा; नवी मुंबईत 4 दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोना
Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचा दर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर

दरम्यान, नवी मुंबई शहर पेालीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. या दरम्यानच, मागील ४ दिवसामध्ये ज्या पोलिसांना कोरोना झाला आहे. त्यातील काही जणांवर विविध हॉस्पिटलमध्ये तर इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गृहविलगीकरणामध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यांनी यावेळी दिली आहे. नवी मुंबईमध्ये गेल्या २४ तासांमध्ये २ हजार ३३७ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर ३१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या नवी मुंबईमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण १११४७ आहे . तर नवी मुंबई मध्ये दिवसात रुग्ण दुपट संख्यने वाढत आहे. यामुळे नवी मुंबई पालिका बंद असलेली ऑक्सिजन बेड कोविड सेंटर परत एकदा सुरू करण्यात येत आहेत. कायदा आणि सुव्यस्था राखण्याकरिता पोलिसांना घराच्या बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, त्यामुळे खाकीवर्दी परत एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. फक्त कर्मचाऱ्यांचा नाही, तर त्यांच्या कुटुंबियांचाही धोका यामुळे वाढला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com