सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी लागणाऱ्या QR कोडची अवैध विक्री, गुन्हा दाखल...

मंदिरात गर्दी होऊ नये व कोरोना संसर्ग वाढु नये म्हणून भाविकांना दर्शन घेण्याकरीता न्यासातर्फे सिध्दीविनायक ॲपद्वारे क्युआर कोडची व्यवस्था करण्यात आलेली होती.
सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी लागणाऱ्या QR कोडची अवैध विक्री, गुन्हा दाखल...
सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी लागणाऱ्या QR कोडची अवैध विक्री, गुन्हा दाखल...Saam Tv

मुंबई: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात (Siddhivinayak Temple, Mumbai) दर्शनासाठी लागणारे क्यूआर कोडची (QR Code) अवैध विक्री प्रकरणी दादर (Dadar) पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मंदिर न्यासाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Illegal sale of QR code required for darshan at Siddhivinayak temple, filing of crime)

हे देखील पहा -

भाविकांची दर्शनाकरीता होणारी गर्दी लक्षात घेता, तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये व कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून भाविकांना दर्शन घेण्याकरीता न्यासातर्फे सिध्दीविनायक ॲपद्वारे क्युआर कोडची व्यवस्था करण्यात आलेली होती. दर्शनासाठी आवश्यक असणारा क्युआर कोड मिळविण्यासाठी भाविकाला सिध्दीविनायक न्यासाने तयार केलेले अॅप सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर डाउनलोड करावे लागते. हा क्युआर कोड अहस्तांतरणीय असुन तो विनामुल्य आहे. मात्र काही दिवसांपासून मंदीर परीसरात क्युआर कोडची अवैधरित्या विक्री केली जात असल्याची माहिती दादर पोलीसांना (Dadar Police) प्राप्त झाली होती. त्यानुसार चौकशी सुरू असताना ३० नोव्हेंबरला एका वर्तमानपत्राच्या पत्रकारांना मंदिर परीसरात क्युआर कोडची विक्री करण्यात आली. याबाबत या पत्रकाराने मंदिर प्रशासनाकडे तक्रार केली होती.

सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी लागणाऱ्या QR कोडची अवैध विक्री, गुन्हा दाखल...
काेराेनाने मृत झालेल्या वारसांना ५० हजारांची मदत; इथं करा अर्ज

यावरून दादर पोलीस ठाण्याने सविस्तर चौकशी करून गुरूवारी सिध्दी विनायक गणपती मंदीर न्यासाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तक्रारीवरून स्वत:च्या फायदयासाठी गैरमार्गाने क्युआर कोडची बुकींग करून, विक्री करणाऱ्या संशयीतांविरोधात गुन्हा (Crime) दाखल केला. पोलिसांनी मंदिर प्रशासन व भाविकांची (Ganesh Devotees) फसवणूक केल्याप्रकरणी कलम ४१९, ४२०, ३४ भादवि सह कलम ३३ (एक्स), १३५ म.पो.का. प्रमाणे गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com