B-School Case Study: कमिन्‍स इंडिया रिडिफाइन २०२३ बी-स्‍कूल केस स्‍टडी स्‍पर्धेत IIM ठरली विजेती

IIM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), मुंबई मधील उल्‍लेखनीय टीम व्हिज़न स्‍पर्धेची विजेती ठरली.
IIM
IIM SaamTv
Published On

B-School Case Study Competition:

देशातील अग्रगण्यांपैकी एक असलेली पॉवर सोल्‍यूशन्‍स टेक्‍नॉलॉजी प्रोव्‍हायडर कमिन्‍स इंडियाने आज त्‍यांची फ्लॅगशिप बी-स्‍कूल केस स्‍टडी कॉम्‍पीटिशन - रिडिफाइन २०२३ च्‍या विजेत्‍यांची घोषणा केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), मुंबई मधील उल्‍लेखनीय टीम व्हिज़न स्‍पर्धेची विजेती ठरली. त्‍यांना प्रतिष्ठित ट्रॉफी आणि रोख बक्षीसासह सन्‍मानित करण्‍यात आलं. (Latest News)

एस पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई मधील टीम कमबॅक ला रनर्स-अप पुरस्‍कारासह गौरविण्‍यात आलं. दोन्‍ही विजेत्‍या टीम्‍सची कमिन्‍स इंडिया लीडरशीपसह समृद्ध मेन्‍टोरशीप प्रोग्राममध्‍ये देखील नोंदणी करण्‍यात येईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कमिन्‍स इंडियाच्‍या एचआर लीडर, अनुपमा कौल यांनी सर्व विजेते, फायनालिस्‍ट्स आणि सहभागींचे त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय योगदानासाठी मन:पूर्वक अभिनंदन केलं. विद्यार्थ्‍यांना सर्जनशीलता व भविष्‍यकालीन सोल्‍यूशन्‍ससह वास्‍तविक विश्‍वातील व्‍यवसाय आव्‍हानांचा सामना करण्‍यास आणि त्‍यांचे निराकरण करण्‍यास प्रेरित करण्‍यासाठी रिडिफाइन डिझाइन करण्‍यात आले आहे. या वार्षिक इव्‍हेण्‍टमधून तरूणांना निपुण करण्‍यासह ग्रोथ माइण्‍डसेटला चालना देण्‍याप्रती कमिन्‍स इंडियाचा संपन्‍न वारसा दिसून येतो.

ज्युरी सदस्‍य म्‍हणून मला उदयोन्‍मुख तरूण प्रतिभांनी सादर केलेले अपवादात्‍मक टॅलेंट व कल्‍पकता पाहण्‍याचा विशेषाधिकार मिळाला. स्‍पर्धा करणाऱ्या टीम्‍सनी सादर केलेले आधुनिक सोल्‍यूशन्‍स आणि सर्जनशील माहिती सर्वोत्तम होत्‍या. यामधून भावी प्रमुखांच्‍या अविश्‍वसनीय क्षमतांवरील आमचा प्रबळ विश्‍वास अधिक दृढ झाल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. 'अनलॉकिंग द पॉवर ऑफ डिजिटलायझेशन इन द आफ्टरमार्केट' थीम असलेल्‍या यंदाच्‍या वार्षिक स्‍पर्धेच्‍या पर्वामध्‍ये देशातील १८ प्रिमिअम बी-स्‍कूल्‍सचे प्रतिनिधीत्‍व करणाऱ्या ९३८ टीम्‍समधील ३७५२ विद्यार्थ्‍यांचा सहभाग दिसण्‍यात आला.

प्रखर मूल्‍यांकन फेऱ्यांना पार करत सहा फायनालिस्‍ट टीम्‍सना निवडण्‍यात आलं. या ६ टीम्‍स दोन दिवसीय ग्रॅण्‍ड फिनालेमध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी पुण्‍यामध्‍ये आल्‍या. इव्‍हेण्‍टमध्‍ये उत्‍साहवर्धक नेतृत्‍वविषयक चर्चा आणि नेटवर्किग संधी, कमिन्‍स टेक्निकल सेंटर इंडिया आणि कोथरूड इंजिन प्‍लाण्‍टचे विशेष दौरे यांचा समावेश होता. कमिन्‍स इंडिया ऑफिस कॅम्‍पस (आयओसी) येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या ज्‍यूरी मूल्‍यांकन फेरीसह इव्‍हेंटची सांगता झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com