पालिकेने व्यवस्था केली असती तर चैत्यभूमीवर गोंधळ उडाला नसता- आनंदराज आंबेडकर

भीम अनुयायांसाठी व्यवस्था न केल्याने ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून संतप्त कार्यकर्त्यांनी बरीकेट्सही तोडले.
"पालिकेने आधिच व्यवस्था केली असती तर असा गोंधळ उडाला नसता" - आनंदराज आंबेडकर
"पालिकेने आधिच व्यवस्था केली असती तर असा गोंधळ उडाला नसता" - आनंदराज आंबेडकरSaam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

दादर: भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६५ वा महापरिनिर्वाण दिन आहे. देशभरातून आंबेडकरी अनुयायी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर (Chaitya Bhoomi) मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत, मात्र पालिकेने यासाठी पुरेसे नियोजन आणि व्यवस्था न केल्याने काही भीमसैनिक आक्रमक झाले आहेत. भीम अनुयायांसाठी व्यवस्था न केल्याने ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून संतप्त कार्यकर्त्यांनी बरीकेट्सही तोडले. यादरम्यान काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (If the municipality had made arrangements, there would not have been chaos in Chaityabhoomi - Anandraj Ambedkar)

हे देखील पहा -

त्याचप्रमाणे "राजकीय नेत्यांच्या लग्नाला गर्दी होते, मग आम्हाला कोरोनाचे कारण देत का अडवलं जातं" असा सवाल उपस्थित करत काही कार्यकर्त्यांनी चैत्यभूमीत शिरण्याचा प्रयत्न केला, यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनीही मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) अपुऱ्या व्यवस्थेवर टीका केला आहे. ते म्हणाले की, "मुंबई महानगरपालिकेने आधीच व्यवस्थित सोयीसुविधा पुरवल्या असत्या तर असा गोंधळ (confusion) उडाला नसता." असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com