हेल्मेट चुकीच्या पध्दतीने घातले तर होणार २ हजाराचा दंड; जाणून घ्या नवे नियम

वाहतुक संबंधीत सरकारने नियमांमध्ये बदल केले आहेत.
Saam Tv
Saam TvTraffic Rules
Published On

नवी दिल्ली : दोन चाकी वाहन चालवताना योग्य पध्दतीने हेल्मेट न घातल्यास आता २ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. दोन चाकी वाहन चालवणाऱ्यांसाठी आता सरकारने नियम बदलले आहेत. वाहन चालवताना कडक सुरक्षेच्या मुद्द्यावरुन नवे नियम लागू करण्यात आले आहेत. वाहतुक पोलिसांनी अडवले असेल तेव्हा तुमच्या डोक्यावर हेल्मेट (Helmet) योग्य पध्दतीने घातले नसेलतर तुम्हाला २ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.

रोड अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मोटर वाहन (Traffic Rules) अॅक्ट १९९८ मध्ये मोठे बदल केले आहेत. या कायद्यात हेल्मेटचा (Helmet) नियम लागू करण्यात आला आहे. भारतात दोन चाकी वाहनांच्या अपघाताची संख्या वाढली आहे. यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. देशात अपघाताच्या बाबतीत नागरिक अजुनही गंभीर झालेले नाहीत. हेल्मेट सोबत ठेवतात पण त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे आता यावर नवे नियम लागू केले आहेत.

Saam Tv
Gyanvapi Masjid Case: 'ज्ञानवापी' प्रकरणी वाराणसी कोर्टात ४५ मिनिटे सुनावणी; निर्णय ठेवला राखून

किती भरावा लागणार दंड

नव्या नियमानुसार (Traffic Rules), जर वाहन चालकाने हेल्मेट (Helmet) घातले असेल पण त्या हेल्मेटची पट्टी खुल्ली असेल तर तुम्हाला १ हजार रुपयांचा दंड भरावा गालू शकतो. जर तुम्ही आयएसआय मानांकनाचे हल्मेट घातले नसेल तर तुम्हाला १ हजार रुपये दंड भरावे लागणार. अनेकवेळा काहीजण पोलिसांना चकवा देण्यासाठी खराब झालेले हेल्मेटचा वापर करतात. पण आता यांच्यासाठीही सरकारने नियम कडक केले आहेत. अशा पध्दतीचे हेल्मेट असेल तर आता वाहतुक पोलीस तुमच्याकडून १ हजार रुपयांचा दंड वसुल करु शकतात.

आता अशा पध्दतीने वाहनचालक (Traffic Rules)सापडले तर त्या वाहन चालका विरोधात कलम १२९ नुसार सरकार कारवाई करु शकते. वाहन चालकाने हेल्मेट घातले असेल पण ते योग्य पध्दतीने घातले नाहीतर त्याच्याकडून २ हजारांचा दंड वसुल केला जावू शकतो. जास्त वजनाच्या गाड्यांविरोधातही सरकारने नवे नियम लागू केले आहेत. नियमापेक्षा जास्त वजन गाड्यांमध्ये असेलतर तुम्हाला २० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर तुम्ही रोज वाहनांचा वापर करत असाल तर हे बदलले नियम एकदा पाहून घ्या नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

लहान मुलांसाठी नवे नियम

तुम्ही वाहन चालवताना जर तुमच्या सोबत लहान मुलगा असेलतर त्या मुलाच्या डोक्यावरही हेल्मेट (Helmet) असणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासोबत हार्नेट बेल्टचा वापर करणे अनिवार्य आहे. हा बेल्ट चालकासोबत बांधुन ठेवावा लागणार आहे. कारण वाहन चालवताना लहान मुलगा यामुळे खाली पडू शकणार नाही.(Traffic Rules)

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com