"संजय राऊतांवर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही जमिनीवर बसू" - प्रवीण दरेकर

प्रविण दरेकर म्हणाले की, जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना दाबायचे अशी परिस्थिती आहे. हा सूडबुद्धीचा कार्यक्रम सरकारचा आहे.
"संजय राऊतांवर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही जमिनीवर बसू" - प्रवीण दरेकर
"संजय राऊतांवर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही जमिनीवर बसू" - प्रवीण दरेकरSaam Tv

मुंबई: भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. प्रविण दरेकर म्हणाले की, जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना दाबायचे अशी परिस्थिती आहे. हा सूडबुद्धीचा कार्यक्रम सरकारचा आहे. भाजप कार्यकर्ता (BJP Worker) किती आक्रमक होतो हे दिसेल. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. संजय राऊत यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल केला नाही तर आम्ही जमिनीवर बसू" अशी भुमिका प्रविण दरेकरांनी घेतली आहे. ("If Sanjay Raut is not charged, we will sit on the ground" - Praveen Darekar)

हे देखील पहा -

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याबद्दल वरळी सिलेंडर स्फोटप्रकरणात, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पेडणेकर यांनी काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. याच प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात भादंवि कलम 354 अंतर्गत मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर आशिष शेलार यांनी माझा आवाज कधी बंद होऊ देणार नाही असं म्हणत आपल्यावर लागू केलेला गुन्हा खोटा आहे असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे, सांगितले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com