मुंबई: आयसीएआय अर्थात द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) मार्फत मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए (Chartered Accountants - CA) च्या परीक्षेचा (Exam) अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यात मुंबईकर असलेला मीत शहा याने ८०.२५ टक्के गुण घेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. CA अंतिम परीक्षेचा निकाल ICAI च्या अधिकृत वेबसाईटवर (CA Result) प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी साइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. (Mahalaxmi resident Meet Shah tops CA final exam in 1st try)
हे देखील पाहा -
देशात सीएच्या परिक्षेत जयपूरचा अक्षत गोयल दुसरा आणि सूरतची सृष्टी केयुरभाई संघवी हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुंबईसह (Mumbai) राज्यात ‘सीए’च्या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्यांची संख्या घटत असतानाच शुक्रवारी मीत शहा याने ती उणीव पुन्हा भरून काढली असल्याच्या प्रतिक्रिया संस्थाचालक, तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत. ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’ मार्फत मे-२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेला देशभरातून एक लाख १८ हजार ७७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेत ग्रुप-१ चा एकूण निकाल २१.९९ टक्के, ग्रुप-२ चा एकूण निकाल २१.९४ लागला. दोन्ही ग्रुपचा निकाल सर्वांत कमी म्हणजे १२.५९ टक्के इतका लागला आहे. परीक्षेत देशभरातून एकूण १२, ४४९ विद्यार्थी यशस्वी ठरले.
मीत शहा यांने सांगितले की, सीए फर्मला कॉर्पोरेटमध्ये जायचे आहे. याशिवाय कोणत्याही सल्लागार किंवा कंपनीत सामील होऊ शकतो. परंतु अजूनही बरेच पर्याय आहेत ज्यांचा मी विचार करेन. मीतचे वडील आता या जगात नाहीत, त्याची गृहीणी आहे. फावल्या वेळात मीत हा सीए उमेदवारांना (परिक्षार्थींना) सल्ला देत असे. सल्लागार म्हणून तो उमेदवारांशी संवाद साधत असे. मीत शहा यांने सांगितले की, त्यांने सीए उमेदवारांना मदत करण्यासाठी एक छोटासा उपक्रम (फर्म) सुरू केला आहे. त्याला मिळालेल्या यशाबद्दल मीत सांगतो की, अंतिम परीक्षेसाठी खूप परिश्रम घेतले हेाते. देशात पहिला येईन, याची खात्री नव्हती, पण टॉपरच्या यादीत असेन, असे वाटले होते. देशात पहिला आल्याने खूप आनंद झाला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.