महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचे 'या' भाजप नेत्याने केले स्वागत

भोंग्याबाबत सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Mohit Kamboj
Mohit KambojSaam Tv

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याच्या मुद्द्यावर सरकारला इशारा दिला होता. भोंग्याच्या मुद्द्यावर राज्यात राजकारण तापले आहे. आता गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. भोंग्याबाबत सर्व मार्गदर्शक सूचनांचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता भोंगे लावण्याअगोदर स्थानिक प्रशासकीय परवानगी घेणे बंधनकारक आहे. या निर्णयाचे भाजप (BJP) नेते मोहित कंबोज यांनी स्वागत केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज मंदिर असो किंवा मशीद असो लाऊडस्पीकर वाजवायचे असल्यास परवानगी घेऊन वाजवावी त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करत आहे असं मोहित कंबोज यांनी म्हणाले.

Mohit Kamboj
नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा; 3 मे पर्यंत सर्वच प्रार्थनास्थळावरील भोंगे काढा, अन्यथा कारवाई

मी गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की, येत्या काळात मशिदीवर लाऊड स्पीकर लावण्यासाठी जी नियमावली तुम्ही ठरवणार आहात तीच नियमावली मंदिराच्या लाऊडस्पीकरबाबत ठरवावी. ८० टक्के लाऊडस्पीकर हे मदरशांवर लावलेले आहेत. २० टक्के लाऊड स्पीकर हे मशिदींवर आहेत, त्यामुळे मदरशांवरील लाऊडस्पीकर हे काढले पाहिजेत, आणि जी मशीद अनधिकृत आहेत, त्या मशिदीला लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केली आहे.

माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, सर्व लोकांनी एकत्रित येऊन ही सामाजिक चळवळ सुरु केलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) जे काही नियम आहेत. ते नियम सरकारने योग्य रीतीने राबवावे आणि मशिदींवरील अनधिकृत भोंगे हे उतरवावेत आणि याची सुरुवात मुंबईतून होईल. मुंबईमधून सर्व देशाला दिशा मिळेल, असंही कंबोज (Mohit Kamboj)म्हणाले.

हे देखील पहा

भोंगे, स्पीकरबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. भोंग्याबाबत सर्व मार्गदर्शक सूचनांचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता भोंगे लावण्याअगोदर स्थानिक प्रशासकीय परवानगी घेणे बंधनकारक आहे.

भोंग्याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा पोलीस (Police) प्रमुख व अधिकाऱ्यांची पोलीस संचालक बैठक घेणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागू नयेत यासाठी हे आदेश काढण्यात आले आहेत. यामुळे आता सर्व धर्मियांना भोंगा किंवा लाऊडस्पिकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकीय परवानगी अनिवार्य राहणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळा्यामुध्ये भोंग्यांचा मुद्दा उपस्थीत करुन राज्य सरकारला ३ मे पर्यंत इशारा दिला होता. यावरुन आता राज्यातील वातावरण तापले आहे. गृह विभागाने आदेश काढून भोंग्याबाबत परवानगीचा निर्णय घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com