Sanjay Raut : पुन्हा तुरुंगात टाका पण घाबरणार नाही, मला कुणी गप्प करु शकणार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

बाळासाहेब नेहमी टीका करणाऱ्यांसोबत चर्चा करायचे. ते सवांद युग होते, आता दडपण युग आहे.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest Newssaam tv

मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत पुन्हा एकदा तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मला तुरुगांत का टाकलं याचा शोध मी अजूनही घेत आहे. मात्र तुंरुगात टाकलं म्हणून मी घाबरलो नाही.

'झेंडू चे झुले' आणि 'घसरगुंडी' या डॉ. महेश केळुस्कर लिखित दोन पुस्तकांचे प्रकाशन आज खासदार संजय राऊत आणि कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते झालं आहे. याठिकाणी संजय राऊत बोलत होते. (Latest Marathi News)

Sanjay Raut Latest News
Anil Parab : अनिल परब यांना मोठा दिलासा; दापोली रिसॉर्ट प्रकरणी अटकपूर्व जामीन

तीन महिने मला फक्त भिंती दिसत होत्या, माणसं दिसत नव्हती. मी रागाने बोलतो आणि लिहितो म्हणून मला तुरुंगात टाकलं. मी अजून शोधतो आहे की मला तुरुंगात का टाकलं. टीका करणे लोकांना आवडतं, पण इतकं दडपण आणणारे वातावरण महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं. बाळासाहेब नेहमी टीका करणाऱ्यांसोबत चर्चा करायचे. ते सवांद युग होते, आता दडपण युग आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut Latest News
MNS News: कोश्यारी नावाचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवा, शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे आक्रमक

मला कुणी गप्प करू शकणार नाही. मी साडेतीन महिने तुरुंगात होतो. हवं तर पुन्हा टाका पण घाबरणार नाही. पुष्पा सिनेमा कदाचित आमच्यासाठीच होता... झुकेगा नहीं साला. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मोडेन पण वाकणार नाही हे शिकलो, असं संजय राऊतांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com