Viral Marathi News : लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच, कधी नवरदेवाच्या कृत्यामुळे लग्न मोडतं. तर कधी वधूकडील मंडळींनी दिलेल्या वागणुकीमुळे. आजकाल लग्नात फसवणुकीच्या अनेक घटना सुद्धा वाढू लागल्या आहेत. लग्न झाल्यानंतर नवरी मुलगी नवऱ्याकडे गेल्यानंतर गंभीर घटना घडत आहेत. अशी एक घटना मुंबईतून समोर आली आहे. (Latest Marathi News)
येथील एका तरुणाचं नुकतंच धुमधडाक्यात लग्न (Wedding) झालं. मात्र, लग्नानंतर त्याला आपल्या पत्नीविषयी असं काही गुपीत कळालं, की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हनीमूनच्या रात्री या तरुणाला आपली बायको बाई नसून ती पुरुष असल्याचं कळालं. यातून पुढे ब्लॅकमेलिंगचा प्रकार घडला.
सुरूवातीला नवरा मुलगा गप्प राहिला. मात्र, ब्लॅकमेलिंगचा प्रकार वाढतच राहिल्याने त्याने ही माहिती थेट कुटुंबीयांना सांगितली. मुलाचे बोलणे ऐकून कुटुंबीयांच्याही पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी थेट घटस्फोटाची मागणी केली आहे. ही घटना नेमकी कशी घडली? याचा तपास पोलिसांकडून (Police) केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार या दोघांची भेट कॉलेजमध्ये झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी सुद्धा त्यांच्या लग्नाला होकार दिला. लग्नाच्या पहिल्या रात्री, नवऱ्या मुलीने तरुणाला पोटात दुखत असल्याचं कारण सांगत त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला.
तरीही नवऱ्या मुलाने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ती जवळ येऊ देत नव्हती. या प्रकारानं मात्र त्याला तिच्यावर संशय आला आणि मग त्यानं तिला हनिमूनला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. तेव्हा मात्र जे त्याच्या दृष्टीनं होयला नको होतं तेच झालं. आपल्या पत्नी स्त्री नसून पुरूष असल्याचे त्याला समजले आणि त्याच्या पायाखालची जमीनचं सरकली.
दरम्यान, या पुरूषानं त्याला ब्लॅकमेल (Crime) करायला सुरूवात केली आणि मग त्यानं याबाबत कुठेही काहीही बोलायचे नाही अशी धमकी दिली. मात्र, ब्लॅकमेलिंच्या या प्रकाराला कंटाळून त्याने आपल्या कुटुंबासह मित्र परिवाराला याची माहिती दिली. त्यानंतर मुलाच्या वैद्यकीय चाचणीची त्याच्या घरच्यांनी मागणी केली आणि शेवटी त्याच्या घटस्फोटाचीही. नेमका हा प्रकार कसा घडला याबाबत पोलीस तपास करत आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.