Nagar News : निळवंडेच्या कालव्यांना गळती, शेतीसह घरांत शिरलं पाणी; आंदाेलकांवर आमदार लहामटेंचा गंभीर आराेप

शेती आणि घराचे पंचनामे करून शेतक-यांना मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
huge loss of farmers nilwande dam water enters in farm and houses near akole
huge loss of farmers nilwande dam water enters in farm and houses near akolesaam tv
Published On

- सचिन बनसाेडे

Nagar News :

तब्बल 52 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाच्या (nilwande dam) डाव्या कालव्यातून अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी सोडण्यात आले. मात्र अकोले तालुक्यातून जाणाऱ्या कालव्याला काही ठिकाणी गळती लागल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात पाणी घुसले. परिणामी शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान या नुकसानीची पाहणी तसेच पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. (Maharashtra News)

अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरण पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी कालव्यांची कामे देखील पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांच्या हस्ते या कालव्यांचे लोकार्पण करत डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले.

huge loss of farmers nilwande dam water enters in farm and houses near akole
Shanishingnapur: शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचा-यांचा बेमुदत संपाचा इशारा

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे 108 दुष्काळग्रस्त गावांना या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय झाला. मात्र कालव्यांची कामे पूर्ण करताना अकोले तालुक्यातील बहुतांश ठिकाणी कालवे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतीसह घरांत शिरले पाणी

सिमेंट काँक्रीट आणि अस्तरीकरण न झाल्याने कालव्यांना गळती लागल्याचे समोर आले. गेल्या महिनाभरापासून कालव्यांना आवर्तन सुरू असून या कालव्यातून होणाऱ्या पाणी गळतीमुळे अकोले तालुक्यातील मेंहदूरी, म्हाळादेवी गावासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातच नव्हे तर घरात देखील पाणी शिरले आहे.

शेतात लावलेला कांदा, सोयाबीन यासह अनेक पिकांना याचा फटका बसला असून हे पीक पूर्णतः हातातून गेले आहे. तसेच घरात पाणी शिरल्याने राहणे मुश्किल झाल्याचे शेतक-यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

ते आंदाेलन मॅनेज : आमदार डॉ. किरण लहामटे

राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे (mla kiran lahamate) म्हणाले आम्ही इतरांसाठीच आमच्या तालुक्यातील जमिनी दिल्या, घर उध्वस्त केली ही वस्तुस्थिती आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी जात असताना अकोले तालुक्यातील झालेल्या नुकसानीला मदत देण्याचे प्राधान्यांन काम राज्यकर्त्यांनी केले पाहिजे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी कालवा फोडण्याचा प्रयत्न केलेले गेलेले आंदोलन हे मॅनेज असल्याचा आरोप देखील आमदार लहामटे यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला

huge loss of farmers nilwande dam water enters in farm and houses near akole
Nagar News : निळवंडे जलाशयाचा कालवा फोडण्याचा प्रयत्न पाेलिसांनी राेखला, आंदाेलकांनी जलसंपदाच्या अधिका-यांना खडसावले

काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी कालवे फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी झालेल्या आंदोलकांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी गुन्हा देखील दाखल आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकीकडे दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्यासाठी कालवे निर्माण झाले मात्र या कालव्यांची कामे होताना त्याचा दर्जा देखील राखणे गरजेचे आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

huge loss of farmers nilwande dam water enters in farm and houses near akole
BJP : भाजप नेत्याचा पुन्हा एकदा दावा, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री 'कमळ' हाती घेण्यास इच्छुक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com