पुणे : कोरोनाची संख्या पुण्यात वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पीएमपीएमएल मधून प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक दोन लशी घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास (Univeral Travel Pass) सक्तीचा करण्यात आला आहे. मुंबईसारख्या (Mumbai) शहरांतही हा पास अत्यावश्यक बनणार आहे. पुढच्या काळात थिएटर्ससारख्या ठिकाणीही हा पास अत्यावश्यक केला जाऊ शकतो. (How to make your universal Travel pass)
आता हा पास बनवायचा कसा, त्यासाठी काय कागदपत्रे लागतील, तो मिळायला किती वेळ लागेल, याची उत्तरं खाली देत आहोत...
या पासवर काय असेल...
-तुमचे नाव
- वय
- तुमचे छायाचित्र
- तुम्ही कोरोना लशी घेतल्याच्या तारखा
- कोविन अॅपवर किंवा तुमच्या लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर असलेला क्यू आर कोड
कसा बनवायचा युनिव्हर्सल पास
शासनाच्या https://epassmsdma.mahait.org/login.htm या वेबसाईटवर जा
तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला इंग्रजी किंवा मराठी भाषेचा आॅप्शन निवडता येईल
तिथे उजव्या बाजूला लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या लोकांसाठी युनिव्हर्सल पास (Universal Pass for Double Vaccinated Citizens) असा निळ्या रंगातला आॅप्शन दिसेल. तिथे क्लिक करा
पुढच्या विंडोमध्ये तुम्ही ज्या मोबाईल क्रमांकावरुन कोविड लसीसाठी नोंदणी केली आहे तो क्रमांक टाका.. मोबाईल क्रमांक टाकून खाली असलेल्या Send OTP आॅप्शनवर क्लिक करा.
तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकला की तुम्ही पुढे जाऊन तुमच्या नावापुढे क्लिक करा
खाली एक फाॅर्म येईल....या फाईलमध्ये तुमच्या लसीकरणाची माहिती असेल...खाली असलेल्या फोटोच्या विंडोत तुमचा फोटो अपलोड करा.. पुढच्या चोवीस तासांत तुमच्या मोबाईलवर युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासची लिंक येईल. त्या लिंकवरुन तुम्ही तुमचा युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास डाऊनलोड करु शकता. त्याची प्रिंटही घेऊ शकता....
मग बनवा तर आपला Universal Pass आणि करा प्रवास....
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.