आता मोबाईलवर एका क्लिकमध्ये मिळवा कोरोना रिपोर्ट! वाचा प्रक्रिया...

कोरोनाची चाचणी झाल्यानंतर आता रिपोर्ट मिळविण्यासाठी तुम्हाला कोव्हिड केंद्रावर जाण्याची गरज नाही.
Corona
Coronasaam tv

-- प्राची कुलकर्णी

पुणे : कोरोनाची चाचणी झाल्यानंतर आता रिपोर्ट मिळविण्यासाठी तुम्हाला कोव्हिड केंद्रावर जाण्याची गरज नाही. आपल्या मोबाईलवरच एका क्लिकमध्ये हे सर्व रिपोर्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे. भारतीय वैद्यक संशोधन संस्था अर्थात आय सी एम आर ने एका संकेतस्थळावर सर्व भारतीयांनी आजवर केलेल्या कोरोना चाचणीचे निकाल उपलब्ध करून दिले आहे. डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून पीडीएफ स्वरूपात आपल्याला हा निकाल मिळविता येतो.

हे देखील पहा :

आपल्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून चुटकी सरशी आपल्याला हा निकाल मिळणार आहे. त्यामुळं तुम्हाला तासंतास रांगेत उभे राहण्याची किंवा निकालाची वाट पाहण्याची गरज नाही. तसेच कार्यालयीन वापरासाठी आपल्याला सहज निकालाची प्रत मिळणार आहे. यासाठी कोरोना चाचणी घेत असताना तुम्ही जो मोबाईल क्रमांक नोंदविला होता त्याची गरज भासणार आहे. हा क्रमांक संबंधित संकेतस्थळावर टाकून आपल्याला आजवर केलेल्या सर्व कोरोना चाचण्या मिळतात.

Corona
हौसेला मोल नाही; जावयाला आणायला शेतकऱ्याने पाठवले चक्क हेलिकॉप्टर!

अशी आहे प्रक्रिया :

- सर्वात प्रथम https://report.icmr.org.in/index.php या संकेतस्थळावर जा

- चाचणीच्यावेळी दिलेला मोबाईल क्रमांक इथे टाका

- एन्टर केल्यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल

- हा ओटीपी एन्टर केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आजवर केलेल्या कोरोना चाचण्या दिसतील

- नमुना दिल्याची तारीख, निदान झाल्याची तारीख, आरटीपीसीआर किंवा अँटीजन चाचणी, निकाल अशी सर्व माहिती स्क्रीनवर दिसते

- सर्वात शेवटच्या रकान्यात डाउनलोडचा पर्याय दिसतो

- त्यावर क्लिक करा आणि मिळवा आपला कोरोना रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com