कडक निर्बधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत...

कोरोनाची वाढती परिस्थती आणि लॉकडाऊन याचा मोठा फटका हॉटेल चालकांना बसला आहे.
कडक निर्बधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत...
कडक निर्बधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत...Saam Tv

सुरज सावंत

मुंबई - कोरोनाची Corona वाढती परिस्थती आणि लॉकडाऊन Lockdown याचा मोठा फटका हॉटेल Hotel चालकांना बसला आहे. एका पाठून एक येणारी कोरोना लाट पाहता हॉटेल किती दिवस असेच बंद ठेवायचे, जागेचे भाडे कसे द्यायचे असे प्रश्न हॉटेल चालकांना सतावू लागले आहेत. Hotel business in trouble due to strict restrictions

परळच्या किर्ती महल या हाँटेलचे मालक ओंमकार दिगंबर कांडारकर हे यांचे अनेक वर्षापासून हॉटेल आहे. मोक्याच्या जागेवर असणाऱ्या या हॉटेमध्ये खवय्याची ही यापूर्वी तितकीच गर्दी असायची आणि त्यासोबतच मिळकत ही तितकीच व्हायची.मात्र कोरोना सुरू झाला आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेला हाँटेल व्यवसाय चांगलाच अडचणीत आला.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आणि हॉटेल बंद ठेवावे लागले. टप्याटप्याने लॉकडाऊन उघडत अत्यावश्यक सेवे बरोबर हॉटेल मध्ये केवळ पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली तेव्हा कुठे या व्यावसायिकांच्या जीवात जीव आला. पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खवय्यानी पार्सलकडे ही पाठ फिरवली आहे. हवा तसा व्यवसाय होत नाही आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतुन बाहेर पडताच दुसरी लाट आली आणि हॉटेल सुरू कसे ठेवायचे हा प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहिला. Hotel business in trouble due to strict restrictions

कडक निर्बधांमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत...
भारताची ऐतिहासिक कामगिरी : लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आता पुन्हा कडक निर्बधा लागू करण्यात आले आहेत. अश्यात पार्सल सेवा तरी सुरू राहील का हा प्रश्न तर आहे पण हॉटेल जागेचे भाडे ही न परवडणारे असल्याने व्यवसायाला टाळे लावण्याची वेळ हॉटेल मालकांवर ओढवली आहे.अश्यात राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी जेणे करून हॉटेल व्यवसाय टिकेल अशी मागणी हॉटेल व्यासायिकांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com