बैलगाडा प्रेंमीसाठी खुशखबर! शर्यतबंदीविरोधी आंदोलनातील गुन्हे मागे घेणार - गृहमंत्री

राज्यात बैलगाडा शर्यतबंदी उठवल्यानंतर गावगाड्यांवर बैलगाडा शर्यती सुरु झाल्यात सर्वत्र चांगला उत्साह आहे.
Dilip Walase Patil
Dilip Walase PatilSaamTV
Published On

पुणे : बैलगाडा शर्यतबंदी (Bullock Cart Race) उठविण्यासाठी राज्यातील बैलगाडा मालकांनी राज्यभरात मोठा संघर्ष उभा केला होता या लढ्याला आता यश आल्यानंतर राज्यात बैलगाडा शर्यतबंदी उठवल्यानंतर गावगाड्यांवर बैलगाडा शर्यती सुरु झाल्यात सर्वत्र चांगला उत्साह आहे. अशातच या बैलगाडा शर्यंतींवरती बंदी असताना त्या चालू होण्यासाठी करण्यात आलेल्या विविध आंदोलनं आणि मोर्चांमध्ये जे काही गुन्हे बैलगाडा प्रेमींवरती दाखल करण्यात आले होते.

Dilip Walase Patil
मला खासदार करण्यात शिवसेनेच्या मंत्र्यांचा सिंहाचा वाटा; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

ते सर्व गुन्हे आते मागे घेण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया लवकरच पुर्ण करणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी सांगितलं आहे. दिलीप वळसेपाटील आंबेगाव तालुक्यातील थापलिंग यात्रेत उपस्थित होते त्यावेळी माध्यमांशी बोलत होते.

गेले अनेक वर्षे संघर्ष करत बैलगाडा मालकांनी न्यायालयीन लढाई जिंकली असली तरी बंदच्या काळात अनेक बैलगाडा मालकांवर स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये (Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले गेले आहे. मात्र यावेळी वळसे पाटील यांच्यावर थेट गृहमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. यावेळी तरी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे अशी विनंती थापलिंगच्या यात्रेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम यांनी केली. त्यानुसार वळसे पाटील यांनी बोलताना बैलगाडा मालकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या असल्याचे सांगितले आहे.

पहा व्हिडीओ -

गुन्हे मागे घेण्याची काय आहे प्रक्रिया ?

बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. तर ज्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत त्या पोलिस स्टेशमधून पोलिस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे, त्यानंतर संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करावा लागणार आहे, त्यानंतर गृहमंत्र्यांकडे हा प्रस्ताव जाईल, गृहमंत्री त्याला मान्यता देतील, तो पुढे न्यायालयात दाखल करून मग गुन्हे मागे घेतले जातील. अशा प्रकारची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना सांगितले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com