प्रवीण दरेकर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार !

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दरेकरांनी अटकपुर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
pravin darekar
pravin darekar Saam Tv
Published On

सुरज सावंत

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दरेकरांनी अटकपुर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयाने (High Court) ही याचिका फेटाळत दरेकर यांनी न्याय दिला नाही. अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करा असे हायकोर्टाने दरेकर यांना निर्देश दिले आहेत.

प्रवीण दरेकरांविरोधात (Pravin Darekar) गुन्हा दाखल होऊन केवळ दोनच दिवस झाले आहेत. तपास प्राथमिक अवस्थेत असताना आरोपीला कोणताही दिलासा देणं योग्य ठरणार नाही. येत्या काळात आवश्यकता भासल्यास प्रतिज्ञापत्र सादर करू दरम्यान याचिकाकर्त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी रितसर अर्ज करावा असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मुंबईच्या एम आर ए मार्ग पोलीस ठाण्यात FIR दाखल प्रकरणात प्रवीण दरेकर यांना मुंबई हायकोर्टातून तूर्तास दिलासा मिळाला नाहीये. त्यामुळे दरेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात एमआरए मार्ग पोलीस स्थानक मुंबई बँक फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी प्रवीण दरेकर यांची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्याचबरोबर विधिमंडळात आमचा आवाज दाबण्यासाठी सरकार असे करत असल्याचा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com