Pune : वाहतुकदारांनाे! पुणे शहरात अवजड वाहनांना आजपासून प्रवेशास बंदी

या बंंदीमधून अत्यावश्यक सेवा या वाहनांना तसेच सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बस यांना वगळण्यात आले आहे. वाहतुकदारांनी बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन वाहतुक पाेलिसांनी केले आहे.
heavy vehicles prohibited entering pune from today
heavy vehicles prohibited entering pune from todaysaam tv

- सचिन जाधव

Pune News :

पुणे शहरात हाेणारे छाेटे माेठे अपघात टाळण्यासाठी तसेच सातत्याने हाेणारी वाहतुक काेंडीतून पुणेकरांची सुटका व्हावी यासाठी पुणे शहर पोलिस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे शहरात अवजड वाहनांना प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून (शनिवार, ता. 23 मार्च) हाेणार आहे. (Maharashtra News)

पुणे शहरातून सोलापूर, नगर, सातारा, मुंबई, नाशिक, सासवड, पौड, आळंदी या रस्त्यांवरून जाणारी जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामध्ये ट्रक व इतर वाहनांनी येताना व जाताना शहरामधील अन्य मार्गाचा वापर करावा असे वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेशात म्हटले आहे.

या बंंदीमधून अत्यावश्यक सेवा या वाहनांना तसेच सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बस यांना वगळण्यात आले आहे. वाहतुकदारांनी बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन वाहतुक पाेलिसांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

heavy vehicles prohibited entering pune from today
Sindhudurg : शिक्षकांसाठी ड्रेस कोड, मुख्याध्यापक पदासाठी पटसंख्येचा नियम रद्द करा; सिंधुदुर्गमध्ये शिक्षकांचे आंदाेलन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com