एकाच पक्षाचे आठ नगरसेवक असूनही कामं रखडलेलीच- शिवसेनेच्या माजी आमदाराचा घरचा आहेर...

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी आपल्या पक्षातील दिवा शहरातल्या आठ नगरसेवकांना टोला हाणत घरचा आहेर दिला आहे.
एकाच पक्षाचे आठ नगरसेवक असूनही कामं रखडलेलीच- शिवसेनेच्या माजी आमदाराचा घरचा आहेर...
एकाच पक्षाचे आठ नगरसेवक असूनही कामं रखडलेलीच- शिवसेनेच्या माजी आमदाराचा घरचा आहेर...प्रदीप भणगे
Published On

दिवा: कल्याणमधील पिसवली गावात विकासकामांच्या भूमिपूजनासाठी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर (Ex. MLA Subhash Bhoir) आले होते. दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भोईर यांनी आपल्या पक्षातील दिवा शहरातील (Diva City) आठ नगरसेवकांना टोला हाणत घरचा आहेर दिला आहे. दिवा आगासन रस्त्यावर एका ट्रक चालकाने उडवले होते. आणि या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. आता या प्रश्नावरून चांगलेच राजकारण पेटले असल्याचे दिसून आले आहे. (having eight Corporators of the same party, the work is stalled - former MLA of ShivSena slams his own party)

हे देखील पहा -

दिवा आगासन रस्त्याचे काम संथगतीने सुरु असल्याने सोमवारी भाजपतर्फे (BJP) निषेध आंदोलन (Agitation) करण्यात आले. तर दरम्यान याच विषयावरून शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार सुभाष भोईर यांनी आपल्याच पक्षातील आठ नगरसेवकांना लक्ष केलं आहे. भोईर यांनी दिवा रोडच्या कामाची माहिती सांगत या बाबतचा मी देखील पत्रव्यवहार केला असल्याची माहिती दिली आहे. आणि त्यांनी सांगितले कि, दिव्यातील आगासन रोडवर मंगळवारी दुपारच्या सुमारास एका ट्रकने तरुणास चिरडले त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. यामुळे दिव्यातील संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर सर्वच स्तरावरून टीका होत आहे.

ही सर्व कामे एका वर्षाभरापूर्वीच पूर्ण झाली पाहिजे होती. तेथील लोकप्रतिनिधींनी ही कामे ठेकेदाराकडून करून घ्यायला पाहिजे होती. तसेच एकाच पक्षाचे आठ नगरसेवक असून सुद्धा कामे अजूनही रखडलेली आहेत. यांना लोकांच्या कामात इंटरेस्ट आहे का ? अजून कशात आहे ? असा सवाल करत भोईर यांनी त्या आठही नगरसेवकांना (Corporators) लक्ष केलं आहे.

एकाच पक्षाचे आठ नगरसेवक असूनही कामं रखडलेलीच- शिवसेनेच्या माजी आमदाराचा घरचा आहेर...
भाजपाची 'ही' प्रवृत्ती लाेकशाहीला घातक : नाना पटाेले

दरम्यान दिवा-आगासन रस्त्यावर अपघातामध्ये तरुणाचा बळी गेल्या प्रकरणी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे केली असून याबाबत तसे पत्र सुद्धा आयुक्तांना दिले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com