गुणरत्न सदावर्तेंकडून नथुराम गोडसेजी असा उल्लेख; म्हणाले, गांधीवादानं देशाची...

'एसटी कष्टकरी जनसंघाचे प्रचारक आगामी निवडणुकीत प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रचार करणार असून आम्ही सहकार मंत्री अमित शहा यांना भेटणार.'
Gunaratna Sadavarte
Gunaratna SadavarteSaam TV
Published On

रुपाली बडवे -

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी आज त्यांच्या नवीन एसटी कर्मचारी संघटनेची घोषणा केली. मात्र, ती करत असताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) नावाचा उल्लेख सदावर्ते यांनी गोडसेजी असा केला, तर गांधीवादाने देशाची फसवणूक केल्याचं वक्तव्यही सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत केलं.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, गेल्या ७० वर्षात कष्टकऱ्यांसाठी काम झालं नाही. कर्मचाऱ्यांची टिंगल केली गेली, वारंवार आम्हाला सांगण्यात आलं की गिरणी कामगारांसारखी परिस्थिती होईल. मात्र आम्ही लढाई लढत राहिलो. गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली आहे. देशात एक मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांनी केला आहे. गांधींनी श्वास सोडताना श्रीराम म्हंंटल होतं असं सांगितंल जातं, परंतु ज्यावेळी नथुराम गोडसेजी यांची कोर्टात ट्रायल झाली त्यावेळीं गोडसेजी यांनी स्पष्ट केलं होतं की गांधी यांनी श्वास सोडताना कधीही हे राम म्हंटलं नव्हतं असं वक्तव्य त्यांनी यावेळी केल.

तसंच आतापर्यंत राजकीय पक्षाच्या आधारावरील कर्मचारी संघटना आहेत. मात्र, आता कष्टकऱ्यांची कर्मचारी संघटना असेल, सदावर्ते यांनी लोकपर्पण केलेली संघटना असेल असं ते म्हणाले. शिवाय दुसरी पत्रकार परिषद घेण्याआधी सगळ्या ST कर्मचाऱ्यांना (ST Employee) कामावर घ्या असं आवाहन देखील त्यांनी सरकारला केलं.

हे देखील पाहा -

एसटी कष्टकरी जनसंघाचे प्रचारक आगामी निवडणुकीत प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रचार करणार असून आगामी काळात आम्ही सहकार मंत्री अमित शहा (Amit Shaha) यांना भेटणार आहोत. कारण, सध्या या सरकारनं सांगितल आहे की, अनेक कर्मचारी कर्जबाजारी आहेत त्यामूळे ते मतदान करु शकणार नाहीत. मात्र, असा कुठलाही नियम नाहीं. ही बाब आम्ही सहकार मंत्र्यांच्या लक्षात आणुन देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सदावर्तेंवरील आरोपी -

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्यातील ते आरोपी असून सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. मराठा आरक्षणादरम्यान केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी देखील सदावर्ते यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com