सुशांत सावंत -
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्या केल्याप्रकणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ST कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. ती आज संपली होती. या प्रकरणातील त्यांचा तपास पुर्ण झाला नसल्याने त्यांना अजून ११ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली असून सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून जवळपास दीड कोटी रुपये जमा केल्याचंही त्यांनी कोर्टाला सांगितलं.
तसंच सदावर्तेंचा (Gunaratna Sadavarte) मोबाईल तपासा, न्यायालयीन कोठडीत अणाऱ्यांना आरोपींपैकी कृष्णात कोरे, सविता पवार, मोहम्मद शेख आणि अभिषेक पाटील चार आरोपींना पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी देखील सरकारी वकीलांना केली. या चौघांनी पवारांच्या घराची रेकी केल्याची माहिती आहे तसंच त्यांचे चेहरी CCTV मध्ये दिसतं आहे त्यामुळे त्यांची कोठडी द्या; असं सांगितलं जात आहे. मात्र, इतर आरोपी हजर नाहीत तोपर्यंत काठडी देता येणार नसल्याचं कोर्टाने सांगितलं.
हे देखील पाहा -
दरम्यान, सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केले त्याची चौकशी व्हावी या सरकारी वकीलांच्या मागणीवर सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला ते म्हणाले, 'एसटी आंदोलन एका वर्षापासून सुरु आहे, तसंच ५३० रुपये गोळा केले त्याची तक्रार एसटी कर्मचाऱ्यांनी केली का? असा प्रश्न कुलकर्णी य़ांनी उपस्थित केला. तसचं जर एकाही कर्मचाऱ्यांनी हा प्रश्न उपस्थित केला नाही तर मग हा मुद्द्याचा उल्लेख येथे करायची गरजच काय असही ते म्हणाले. त्यांच्या या प्रश्नावर सरकारी वकीलांनी त्यांनी जर पैसे घेतलेत तर त्याची चौकशी व्हायला हवी असं कोर्टाला सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.