आपल्या प्रियजनांना द्या इंधन भेट! इंडियन ऑईलची भन्नाट कल्पना

"लग्न साजरं करण्यासाठी अगदी योग्य भेटवस्तू,” अशी जाहीरात या व्हाऊचर्ससाठी करण्यात आली आहे.
आपल्या प्रियजनांना द्या इंधन भेट! इंडियन ऑईलची भन्नाट कल्पना
आपल्या प्रियजनांना द्या इंधन भेट! इंडियन ऑईलची भन्नाट कल्पनागोपाळ मोटघरे
Published On

पुणे - दिवसेंदिवस होणाऱ्या इंधन दरवाढी मूळे अनेकांच्या डोळ्यासमोर केवळ दरवाढीचे आकडे फिरतात. मात्र इंडियन ऑइल कॉर्परेशनने आता याच इंधनदरवाढीचा एका भन्नाट कल्पनेसाठी वापर केला आहे. आपल्या प्रियजनांना भेट वस्तू देण्याऐवजी इंधन भेट म्हणून देण्याचा पर्याय इंडियन ऑइल कॉर्परेशनने दिलं आहे. 

हे देखील पहा -

आयओसीने फ्यूएअल व्हाऊचर्सची खास सुविधा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता आपल्या प्रियजनांच्या खास दिवसानिमित्त त्यांना रोख रक्कम किंवा इतर गोष्टी भेट देण्याऐवजी हा पर्याय आजमावता येणार आहे. वन फॉर यू हे इलेक्ट्रीक फ्यूएअल व्हाऊचर थेट ऑनलाइन विकत घेता येणार आहे. आयओसीने यासंदर्भातील एक जाहिरात ट्विटरवरुन पोस्ट केली आहे.

आपल्या प्रियजनांना द्या इंधन भेट! इंडियन ऑईलची भन्नाट कल्पना
Sindhudurg: हूंबरट येथील उर्दू शाळेची दयनीय अवस्था

"लग्न साजरं करण्यासाठी अगदी योग्य भेटवस्तू,” अशी जाहीरात या व्हाऊचर्ससाठी करण्यात आली आहे. “तुमच्या प्रियजनांच्या आयुष्याची नवीन सुरुवात आणखीन खास करा. लग्न साजरं करण्यासाठी अगदी योग्य गिफ्ट म्हणजे इंडियन ऑइलचं वनफॉरयू ई फ्यूएल व्हाऊचर. आजच विकत घ्या आणि तुमच्या प्रियजनांवर या माध्यमातून प्रेमाचा आणि आशिर्वादाचा वर्षाव करा,” अशा मजकुरासहीत या व्हाऊचरची जाहिरात करण्यात आली आहे. त्यामुळे काहींना आयओसीची ही कल्पना अगदी आवडली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com