यावर्षी बाप्पाचे आगमन खड्ड्यांतून???

गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही डोंबिवली शहरात आणि 27 गावात पालिका प्रशासनाला खड्डे बुजविणे अद्यापही शक्य झालेले नाही. त्यामुळे बाप्पाचे आगमन रस्त्याच्या खड्ड्यांतून होणार का असा प्रश्न पडला आहे.
यावर्षी बाप्पाचे आगमन खड्ड्यांतून???
यावर्षी बाप्पाचे आगमन खड्ड्यांतून???प्रदीप भणगे
Published On

डोंबिवली : गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही डोंबिवली शहरात आणि 27 गावात पालिका प्रशासनाला खड्डे बुजविणे अद्यापही शक्य झालेले नाही. डोंबिवली शहरातील टिळक रोड, जोशी शाळेचा रस्ता, सारस्वत कॉलनी रस्ता, घरडा सर्कल, डोंबिवली पश्चिम आणि 27 गावात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे यंदाचे गणेशोत्सव आगमन खड्ड्यांतून काढण्याची वेळ नागरिकांवर येण्याची शक्यता आहे. (Ganpati Bappa's arrival from the pothole on the road this year?)

महापालिकेत प्रशासकीय राजवट चालू आहे, मात्र आयुक्तांनी रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसते. राजकीय मंडळी आणि सत्ताधारी शिवसेनेनेसुद्धा खड्ड्यांबाबतीत मौन पाळले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने या वर्षीही गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहे. तसेच नियमांचे पालन करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या निर्बंधांविषयी गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी असली तरी गणेशोत्सवासाठी मंडळांनी तयारी सुरू केली आहे.

यावर्षी बाप्पाचे आगमन खड्ड्यांतून???
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनावर रश्मी देसाईची पहिली प्रतिक्रिया

डोंबिवली शहरात आणि 27 गावात घरगुती गणपतींचे आगमनही मोठ्या प्रमाणात होत असते. खड्ड्यांमुळे शहरात ट्रॅफिक जाम सुद्धा होऊ लागेल आहेत. मात्र गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही महापालिकेकडून खड्डे बुजविण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन हे खड्डे कधी बुजवणार असा सवाल उपस्थित होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com