Maharashtra Politics: 'मातोश्री'वरचं प्रेम गजानन कीर्तिकरांना भोवणार? पक्षातून होणार हकालपट्टी?

Gajanan Kirtikar News: खासदार गजानन कीर्तिकर यांची लवकरच शिंदे गटातून हकालपट्टीची होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचा आरोप होतोय.
'मातोश्री'वरचं प्रेम गजानन कीर्तिकरांना भोवणार? पक्षातून होणार हकालपट्टी?
Gajanan KirtikarSaam Tv

गिरीश निकम, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत चुरस दिसून आली. आता निकालाची प्रतिक्षा असतानाच या मतदारसंघात नवा राजकीय संघर्ष सुरू झालाय. शिंदे गटातले विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना ठाकरे गटात असलेल्या अमोल कीर्तिकरांवरील पुत्रप्रेम भोवण्याची शक्यता आहे. 2014 आणि 2019 असे सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले गजानन किर्तीकर शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदेबरोबर गेले.

मात्र त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर ठाकरे गटातच राहिले. मात्र लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकरांना उमेदवारी मिळाली आणि ख-या अर्थानं गजानन किर्तीकर अडचणीत आले. शरीराने ते महायुतीत मात्र मनानं ठाकरे गटात असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.

'मातोश्री'वरचं प्रेम गजानन कीर्तिकरांना भोवणार? पक्षातून होणार हकालपट्टी?
Maharashtra Politics: महाराष्ट्रात महायुती की मविआ? लोकसभेत कोण मारणार बाजी? योगेंद्र यादवांची काय आहे भविष्यवाणी?

रामदास कदम यांनी तर सुरुवातीपासून गजानन किर्तीकरांना उघड विरोध करत उत्तर-पश्चिममधून पुत्र सिद्धेश कदम यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र अखेरच्या क्षणी शिंदे गटानं रविंद्र वायकर यांना रिंगणात उतरवलं. मात्र कीर्तीकर यांनी मुलाला विजयी करण्यासाठी पूर्वनियोजित कट रचला होता असा गंभीर आरोप भाजपनं केला होता. शिशीर शिंदे यांनीही किर्तीकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे. त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती.

गजानन कीर्तीकर यांच्या पत्नी विदीशा किर्तिकर यांनी तर पुत्र अमोल यांनाच मतदान केल्याचे जाहीरपणे सांगितले होते. तर कीर्तिकरांनीही वडीलप्रेम लपवू शकले नव्हते.

'मातोश्री'वरचं प्रेम गजानन कीर्तिकरांना भोवणार? पक्षातून होणार हकालपट्टी?
Maharashtra Politics: महाराष्ट्रात महायुती की मविआ? लोकसभेत कोण मारणार बाजी? योगेंद्र यादवांची काय आहे भविष्यवाणी?

कीर्तिकरांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी शिंदे गटातील नेत्यांनी केलीय. मात्र मुख्यमंत्री शिंदे त्यांच्यावर तातडीनं कारवाई करणार की 4 जूनला उत्तर पश्चिम मतदारसंघाचा काय निकाल येतो, यावर ठरवणार याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com