गडचिरोली: हत्ती स्थलांतरणाची लढाई आता न्यायालयात; वन पर्यावरण मंत्रालयाला नोटीस

गडचिरोलीतील हत्ती स्थलांतरणाची लढाई आता थेट न्यायालयात जाणार आहे.
गडचिरोली: हत्ती स्थलांतरणाची लढाई आता न्यायालयात; वन पर्यावरण मंत्रालयाला नोटीस
गडचिरोली: हत्ती स्थलांतरणाची लढाई आता न्यायालयात; वन पर्यावरण मंत्रालयाला नोटीसSaam Tv
Published On

अश्विनी जाधव केदारी

गडचिरोली: जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागाअंतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्पमधील हत्ती गुजरातच्या जामनगर येथील खासगी प्राणिसंग्रहालयात पाठवण्याच्या निर्णयाला ऍड असीम सरोदे यांनी विरोध केलाय, इतकंच नव्हे तर गडचिरोलीतील हत्ती स्थलांतराविरोधात (Gadchiroli Elephant Migration) केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाला कायदेशीर नोटीसच पाठवली आहे.

गडचिरोली: हत्ती स्थलांतरणाची लढाई आता न्यायालयात; वन पर्यावरण मंत्रालयाला नोटीस
धक्कादायक! दारूच्या नशेत बकऱ्याऐवजी कापला माणसाचा गळा..

या नोटीसमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कमलापूर हत्ती कॅम्प हा महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पातानील या ठिकाणीसुद्धा काही हत्तींचा अधिवास आहे. जिल्ह्यातील हत्तींना गुजरात येथील रिलायन्स कंपनीच्या खासगी प्राणी रेस्क्यू सेंटर येथे पाठवण्यात येत आहे. हे हत्तींचे स्थलांतरण प्राणी हक्कांविरोधात असून स्थानिकांना निर्माण होणाऱ्या उपजीविकेवरसुद्धा गदा आणणारे आहे.

हे देखील पहा-

सात दिवसांत समाधानकारक उत्तर न आल्यास आणि स्थलांतर थांबवण्यासाठी कुठलीही हालचाल न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद आहे. अनेक वर्षांपासून कमलापूर, पातानील या ठिकाणी हत्तींचे वास्तव्य आहे. प्राणी आपला अधिवास निश्चित करत असतो. अशावेळी पूर्णपणे रमलेल्या हत्तींना खासगी संग्रहालयात पाठविल्यामुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com