म्हाडाचा मोठा निर्णय! पेपरफुटी प्रकरणी GA सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीत टाकलं (पहा Video)

डिसेंबर महिन्यात म्हाडाच्या परिक्षेच्या आदल्या दिवशीच म्हाडाची परिक्षा रद्द करण्यात आली आणि त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले होते.
म्हाडाचा मोठा निर्णय! पेपरफुटी प्रकरणी GA सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीत टाकलं (पहा Video)

प्राची कुलकर्णी -

पुणे : गट अ आणि गट ड परिक्षांमध्ये निष्काळजीपणा दावल्यामुळे GA सॉफ्टवेअर (GA Software Company) या कंपनीला कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. डिसेंबर महिन्यात म्हाडाच्या परीक्षेच्या आदल्या दिवशीच म्हाडाची परीक्षा रद्द करण्यात आली आणि त्यामुळे परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हाल झाले होते. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून GA सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालकांना अटकही केली होती, तसंच या कंपनीच्या निष्काळजीपणाबाबत कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सातत्याने MPSC समन्वय समिती कडून करण्यात आली होती.

दरम्यान MPSC समन्वय समितीने म्हाडा (Mhada) परीक्षा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर GA सॉफ्टवेअरचे प्रीतीश देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यांनतर TET आणि इतर घोटाळे उघडकीस आले होते. GA सॉफ्टवेअर या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सातत्याने MPSC समन्वय समिती कडून करण्यात आली होती आणि आज अखेर शासनाने या कंपनीला काळ्या यादीत टाकल्याचं जाहीर केलं आहे.

GA सॉफ्टवेअर या कंपनीला गृहनिर्माण विभागामार्फत कायमचे काळ्या यादीत टाकण्यात आले आहे याबद्दल आम्ही मा. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे आभार मानतो. परंतु न्यासा कंपनीला अजूनही आरोग्य विभागाने (Health Department) काळ्या यादीत टाकलेले नाही. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य भरती बद्दल, तसेच या कंपनी बद्दल कोणताही निर्णय घेतलेला दिसत नाही, त्यांना आमची विनंती आहे की, बेरोजगार विद्यार्थांचा अंत न बघता तत्काळ निर्णय घ्यावे असं एमपीएससी समन्वय समितीने म्हंटलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com