Sindhutai Sapkal: अनाथांची माय पंचतत्वात विलीन

Sindhutai Sapkal: पुण्यातील नवी पेठ परिसरातील ठोसर पागा मध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Cremation) करण्यात आले.
Padma Shri Awardee Sindhutai Sapkal Passed Away
Padma Shri Awardee Sindhutai Sapkal Passed Away Saam TV
Published On

पुणे: ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील नवी पेठ परिसरातील ठोसर पागा मध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अनाथांची माता अखेर आता पंचत्वात विलीन झाली आहे. अवघ्या महाराष्ट्राने सिंधुताईंना (Sindhutai Sapkal) जड अंतःकरणाने अखेरचा निरोप दिला. त्यांच्या या अंत्यसंस्कारावेळी राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी आमदार उल्हास पवार, भाजप नेत्या चित्रा वाघ, आमदार संजय जगताप, महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यावेळी उपस्थित होते. (sindhutai sapkal funeral)

हे देखील पहा -

महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांनी काल रात्री वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन होते, त्या ७३ वर्षांच्या होत्या. काल (मंगळवार, ४ जानेवारी) रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. पुण्यातील (Pune) गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिन्याभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आज त्यांच्यावर पुण्यातील नवी पेठ परिसरातील ठोसर पागा मध्ये अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com