माजी आमदार विवेक पंडित
माजी आमदार विवेक पंडितचेतन इंगळे

माजी आमदार ठरले मुंबई विद्यापीठाचे टॉपर; MA ला 94 % गुण

माजी आमदार विवेक पंडित हे वयाच्या 64 व्या वर्षी मुंबई विद्यापीठातून एम. ए. (राज्यशास्त्र) परीक्षा विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. राज्यशास्त्र या विषयात त्यांनी मुंबई विद्यापीठातून प्रथम येण्याचा विशेष बहुमान प्राप्त केलाय.
Published on

वसई/विरार : आदिवासी बांधवांसाठी काम करणारे, श्रमजीवी संघटनेचे सर्वेसर्वा व वसईचे माजी आमदार विवेक पंडित हे वयाच्या 64 व्या वर्षी मुंबई विद्यापीठातून एम. ए. (राज्यशास्त्र) परीक्षा विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. राज्यायशास्त्र या विषयात त्यांनी मुंबई विद्यापीठातून प्रथम येण्याचा विशेष बहुमान प्राप्त केला असून या विशेष परीक्षेत त्यांनी 94 टक्के गुणांची कमाई केली आहे.

हे देखील पहा -

दरम्यान, विद्यार्थीदशेत तथा महाविद्यालयीन शिक्षणाच्या दरम्यान त्यांनी विविध राजकीय व सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेतला होता. शालांत परीक्षेत म्हणजेचं एस एस सी परीक्षेत विवेक पंडित यांना फक्त 48 टक्के गुण मिळाले होते.

माजी आमदार विवेक पंडित
ग्रामपंचायत सक्षमीकरणसाठी फळबाग लागवडीस प्रोत्साहन द्यावे - पवार

त्यांनतर त्यांना पदवी परीक्षेच्या दरम्यान ते सातत्याने चळवळीत व्यस्त असल्याने अवघ्या 38 टक्के गुणांसह ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मात्र, आता वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अगदी नेटाने अभ्यास करून एम ए (राज्यशास्त्र) या पदव्युत्तर विशेष पदवी परीक्षेत तब्बल 94 टक्के गुण संपादित केले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com