मुंबईत इमारतीच्या १४ व्या मजल्यावर भीषण आग!

fire in bandra
fire in bandrasaam tv

मुंबई : मुंबईत वांद्रे येथे हायराईज इमारतीच्या १४ व्या मजल्यावर भीषण आग (Fire at bandra) लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade) आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याजवळ बॅंड स्टॅंड रोडला असलेल्या जिवेश इमारतीजवळ (२१२/C) भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.

fire in bandra
ठाण्याला मिळणार १० एमएलडी अतिरिक्त पाणी; एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ७.४६ वाजताच्या सुमारास हायराईज इमारतीच्या १४ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, मुंबईच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्यासाठी आठ बंब पोहोचले आहेत. तसंच या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आणि आरोग्य यंत्रणाही घटनास्थळी पोहोचल्याचे समजते. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाल यश आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com