ठाण्याला मिळणार १० एमएलडी अतिरिक्त पाणी; एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई महापालिकेची मंजुरी, वागळे इस्टेटला होणार लाभ
Eknath Shinde
Eknath ShindeSaamTvNews

रश्मी पुराणीक

ठाणे : शहराची वाढती लोकसंख्या (Thane Population) लक्षात घेऊन ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या (BMC) कोट्यातून अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाठपुरावा केला होता. मुंबई महापालिकेकडून ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा (water supply) मंजूर झाला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून ठाणेकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

Eknath Shinde
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; सूर्यकुमार यादव IPL मधून बाहेर, कारण...

ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराला मुंबई महापालिकेच्या पाईपलाईनद्वारे अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तसेच, मुंबई महापालिकेलाही यासंदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेनेही मुंबई महापालिकेकडे पाण्याची मागणी केली होती.

त्यानुसार मुंबई महापालिकेने ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. ठाणे महापालिका या पाण्यावर प्रक्रिया करून प्रमुख्याने वागळे इस्टेट परिसराला या पाण्याचा पुरवठा करणार आहे. या निर्णयाबद्दल शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिका आयुक्त चहल यांचे आभार मानले आहेत.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com