मुंबई : राज्यात परमबीर सिंग Parambir Singh, सचिन वाझे Sachin Waze अशा अधिकाऱ्यांमुळे पोलिस Police दलाची प्रतिमा मलिन झालेली असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या Mumbai तीन पोलिस अधिकाऱ्यांनी एका प्राॅपर्टी डिलरकडून १७ लाख रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा FIR दाखल झाला आहे. FIR against three mumbai police officers
या प्रकरणात या प्राॅपर्टी डिलरने अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. फसवणूक आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या खबऱ्यामार्फत तब्बल १७ लाख रुपये उकळले असल्याची या प्राॅपर्टी डिलरची तक्रार आहे. पैसे देऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती, असेही त्याने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात एक पोलिस उपायुक्त DCP व दोन पोलिस निरिक्षकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दाखल झालेल्या फिर्यादीनुसार संबंधित तक्रारदाराने पैसे न दिल्याने त्याला एका गुन्ह्यात गोवत एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गुन्हे शाखा १० कडे वर्ग करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी संबंधित तक्रारदाराला मारहाण करुन त्याच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. FIR against three mumbai police officers
या प्रकरणात दिलेल्या तक्रारीत नोंद केलेल्य डीसीपीसह दोन पोलिस निरिक्षकांचा उल्लेख आहे. त्यापैकी एक पोलिस निरिक्षक अटकेत असून त्याला यापूर्वी खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. दुसरा निरिक्षक खात्यात अद्यापही कार्यरत आहे. दरम्यान, संबंधित तक्रारदाराचे काॅल रेकाॅर्ड चेक केले त्यावेळी तो चुकीचे सांगत असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत आम्ही न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे, असा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.