अखेर पुण्यातील निर्बंध शिथील; पहा काय सुरु काय बंद

पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट २.८८ टक्क्यांपर्यंत खाली आला असून जर, पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा ७ टक्क्यांपर्यंत गेला तर कडक निर्बंध लावण्यात येतील असा पालकमंत्री अजित पवारांचा इशारा
अखेर पुण्यातील निर्बंध शिथील; पहा काय सुरु काय बंद
अखेर पुण्यातील निर्बंध शिथील; पहा काय सुरु काय बंदSaam tv news
Published On

कोरोनाच्या (Covid19) पार्श्वभूमीवर शहरात लागू कऱण्यात आलेले निर्बंध (Restrictions) शिथील करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज पुण्यात आयोजित बैठकीत शहरातील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ग्रामीण भाग देखील 3 टप्प्यात असून ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल केले जात असले तरी पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के झाल्यास पुन्हा कडक निर्बध लावले जातील असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. (Finally, the corona restrictions in Pune have been relaxed)

अखेर पुण्यातील निर्बंध शिथील; पहा काय सुरु काय बंद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार, घोषणेकडे महाराष्ट्राचे लक्ष !

दरम्यान, गेल्या महिनाभरात पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट सातत्याने घटत असल्याचे दिसून आले आहे. ४ ते १० जुलै काळात ४.९८ टक्क्यांवर असणारा पॉझिटिव्हीटी रेट २.८८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. याच पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ केली होती.

- पुण्यात सर्व दुकाने सर्व दिवशी सुरु राहतील.

- रेस्टॉरंट आणि हॉटेल आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरु राहतील

-साप्ताहिक सुट्टी नुसार शहरातील दुकाने आठवड्यातून एक दिवस बंद राहतील.

- कोरोना लशीचे दोन डोस झालेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार

- जलतरण तलाव, मॉल, हॉटेलसाठी नवी नियमावली लागू केली जाणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com