पुणे : 'दगडूशेठ हलवाई' गणपतीला ५० लाख फुलांचा सुवासिक पुष्पनैवेद्य

Shreemant Dagdusheth Halwai Ganpati)
Shreemant Dagdusheth Halwai Ganpati)saam tv
Published On

पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati) दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी अंगारकी चतुर्थीनिमित्त अलोट गर्दी केली होती. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त ५० लाख सुवासिक फुलांचा पुष्पनैवेद्य (Fifty lakh flowers) गणरायाला दाखविण्यात आला. मोगऱ्यासह गुलाब, चाफा, झेंडू, लिलीसारख्या फुलांनी सजलेला सभामंडप आणि गाभारा तसेच मुकुट, शुंडाभूषण, कान व पुष्पपोशाखाने सजलेले गणरायाचे मनोहारी रुप पुणेकरांना पाहायला मिळाले. अंगारकी चतुर्थीनिमित्त (Angarki Sankashti Chaturthi Celebration) कळसापासून पायथ्यापर्यंत केलेली पुष्पआरास आणि मोगरा महोत्सवानिमित्त विविधरंगी फुलांनी सजलेले मंदिर पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Shreemant Dagdusheth Halwai Ganpati)
पोलखोल अभियान : रथावर हल्ला करणाऱ्यास अटक करा; भाजपचा मोर्चा धडकणार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले होते. तब्बल १०० महिला व १२५ पुरुष कारागीरांनी पुष्पसजावटीची तयारी केली होती.

यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ७०० किलो मोगरा, २५ हजार चाफा, ५० हजार गुलाब, ५० किलो कन्हेर, जाई, जुई, केवळा, कमळ, ५०० किलो गुलछडी, पासली, लिली यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.

Edited By- Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com