Ravindra Mahajani Passed Away: प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

Ravindra Mahajani Passed Away: मराठी सिनेसृष्टीवर आघात करणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन झालं आहे.
Famous Marathi Actor Ravindra Mahajani Passed Away
Famous Marathi Actor Ravindra Mahajani Passed AwaySaam TV
Published On

Famous Marathi Actor Ravindra Mahajani Passed Away: मराठी सिनेसृष्टीवर आघात करणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन झालं आहे. मावळच्या तळेगाव दाभाडील (Pune News) आंबी येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र यांचं वय ७७ वर्ष होतं. त्यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Famous Marathi Actor Ravindra Mahajani Passed Away
Oxygen Mask Fire: ICU मध्ये उपचार सुरू असतानाच ऑक्सिजन मास्कला आग, भयंकर घटनेत रुग्णाचा मृत्यू

रवींद्र महाजनी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचं शेजारील रहिवाशांना कळालं.

त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना (Police) दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता, महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Famous Marathi Actor Ravindra Mahajani Passed Away
Vasai Waterfall News : वसईचा चिंचोटी धबधबा ठरतोय जीवघेणा, २४ तासात ३ पर्यटकांचा मृत्यू

गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. देखणेपण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर अभिनेते महाजनी यांनी १९७५ ते १९९० चा काळ त्यांनी गाजवला.

त्याकाळी ते अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. "मुंबईचा फौजदार" , देवता हे त्यांचे चित्रपट खूप गाजले. रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली. मात्र त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com