पुणे - राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या पुणे (Pune) शहर पोलीस (Police) दलातील पोलीस हवालदारासह, इतर तीन लिपीकावर वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलीस (Pune Police) दलात आजवर मिळालेल्या राष्ट्रपती पदकांच्या पात्रते वर मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.
पोलीस खात्यात राष्ट्रपती पदक हा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जातो. पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पदक मिळतो. मात्र स्वतःच पोलीस खात्यातील कार्यकाळ वादग्रस्त असताना देखील पुणे पोलिसात कार्यरत असणाऱ्या गणेश अशोक जगताप या पोलीस हवालदाराने राष्ट्रपती पदका मिळवण्यासाठी चक्क बनावट कागदपत्रे तयार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
हे देखील पहा -
या प्रकरणात आरोपी गणेश जगताप, पोलीस खात्यातील लिपीक नितेश आरविंद आयनूर, रविंद्र धोंडीबा बांदल आणि एका अज्ञात ठाणे अंमलदारावर पुण्यातील वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
गणेश जगताप यांनी राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याने एकूणच पोलिस खातात आजवर मिळालेल्या राष्ट्रपतीपदाच्या वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पुणे पोलिस दलात राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची तपासणी योग्य पद्धतीने पडताळणी होत नसल्याने गणेश जगताप सारख्या पोलिस कर्मचाऱ्याने बनावट कागदपत्र तयार करण्याचं धाडस दाखवलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.