मुंबई : विविध राज्यातील नामकिंत विद्यापीठांच्या पदव्या ड्राॅपआऊट व शिक्षण न घेणाऱ्या विद्यार्थ्याना देऊन पैसे उकळणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रितेश सोहनलाल जैन (३४), रविप्रकाश वीरेंद्र मौर्य (२६) यांना बोरिवली पूर्व येथून अटक करण्यात आली आहे.
हे देखील पहा :
आतापर्यंत या आरोपींनी ५० हून अधिक जणांना बनावट प्रमाणपत्रे दिली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपी एका पदवीसाठी अंदाजे २ ते अडीच लाख रुपये घेत होते. हे आरोपी पदवी हवी असलेल्या तरुणांना मॉन्स्टर आणि क्विकर अॅपच्या माध्यमातून संपर्क करत होते. तसेच हे आरोपी प्राइम सॅफायर एज्युकेशन कन्सल्टच्या नावाने कार्यालय चालवत होते.
या आरोपींनी कुठल्या कुठल्या विद्यापीठांच्या नावाने तरुणांना आतापर्यंत पदवीची बनावट प्रमाणपत्र दिली आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपींकडून कर्नाटक राज्य विद्यापीठ, साबरमती विद्यापीठ, एपीजे अब्दुल कलाम विद्यापीठ, सत्यसाई विद्यापीठ, हिमालय विद्यापीठ या विद्यापीठांची बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस पुढील तपास करत आहेत.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.